ETV Bharat / state

Matheran Toy Train : माथेरान टॉय ट्रेनला प्रवाशांचा प्रतिसाद; आतापर्यंत तीन लाख चार हजार लोकांनी प्रवास केला - माथेरान पर्यटन स्थळ

मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वांत जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ (Matheran Tourist Spot) आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन (Neral Matheran Toy Train), जी १०० वर्षांहून अधिक जुनी आहे. ही भारतातील काही पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे. यावर्षी कोरोना महामारीनंतर गर्दीचा उच्चांक माथेरानने (Tourist Crowd in Matheran) मोडलेला आहे. माथेरानकरिता जाणाऱ्या टॉय ट्रेनमध्ये (Passenger Response to Matheran Toy Train) तीन लाख 4 हजार प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. (Latest news from Mumbai)

Passenger Response to Matheran Toy Train
टॉय ट्रेन माथेरान
author img

By

Published : Jan 8, 2023, 7:01 PM IST

मुंबई : वर्ष २०१९ मध्ये मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला नेरळ-माथेरान ट्रॅक (Neral Matheran Toy Train) पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेने जोरदार प्रयत्न केले आहेत. (Matheran Tourist Spot) नेरळ ते अमन लॉजपर्यंत पर्वतांना वळसा घालणारी नॅरोगेज लाईन अखेर तयार झाली आणि या मार्गावरील सेवा दि. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी पुन्हा सुरू करण्यात आली. अमन लॉज ते माथेरान दरम्यानच्या शटल सेवा आधीच प्रवासी (Passenger Response to Matheran Toy Train) आणि पार्सल घेऊन जाणाऱ्या सेवेत होत्या. टॉय ट्रेनच्या सेवेचे प्रवाशांनी (Tourist Crowd in Matheran) अखंड आनंदात स्वागत केले आहे. (Latest news from Mumbai)

Passenger Response to Matheran Toy Train
टॉयट्रेनचा आनंद घेताना प्रवासी

रेल्वे प्रशासनाला 3 लाखांचा महसूल : एकूण ३,०४,१९५ प्रवाशांना माथेरानचा प्रवास घडविण्यात आला असून त्यात एप्रिल ते डिसेंबर२०२२ या कालावधीतील अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या २,७६,९७९ आणि ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीतील नेरळ आणि माथेरान दरम्यानच्या २७,२१६ प्रवाशांचा समावेश आहे. एकूण नोंदणीकृत महसूल रु. २,२०,९०,०२० आहे. ज्यामध्ये अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते डिसेंबर-२०२२ या कालावधीसाठीचे रु.१,८६,६३,३४८/- आणि ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीसाठी माथेरान - नेरळ दरम्यान रु. ३४,२६,६७२/- या व्यतिरिक्त या विभागात एकूण १०,९८३ पॅकेजेसची पार्सल वाहतूक करण्यात आली आहे. ज्यातून ३,०४,३२५/- रुपयांचा महसूल नोंदवला गेला आहे.

माथेरानची ट्रेनपरी

सुरक्षित आणि आरामदायी प्रवास : यामध्ये अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत ७,६१८ पॅकेजेसचा समावेश आहे. ज्यामधून रु.२,७९,८२३/- महसूल मिळाले असून ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत नेरळ आणि माथेरान दरम्यान आणि ३,३६५ पॅकेजेस मधून रु.२४,५०२/- महसूलाची नोंदणी झाली आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते.

टॉय ट्रेनमधील प्रवास अविस्मरणीय : यासंदर्भात रेल्वे प्रवासी दीपक सोनवणे यांनी सांगितले की, मध्य रेल्वे हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही. तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय करीत आहे. हा टॉय ट्रेनमधील प्रवास अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार काही वेगळाच आहे."

आरामदायी प्रवास : मध्य रेल्वे नियमितपणे अमन लॉज ते माथेरान दरम्यान प्रवाशांसाठी शटल सेवा चालवते. ही आकडेवारी या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते.

माथेरानचे नैसर्गिक वातावरण: मध्य रेल्वे माथेरान (matheran) हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय करत आहे. हे टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करते आणि त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत रममाण होते.

माथेरान मिनी ट्रेन: माथेरान जवळील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे नेरळ. पुणे-मुंबईहून रेल्वेने येणारे प्रवासी नेरळ रेल्वे स्थानकावर उतरतात पण नेरळ पासून माथेरानला पोहोचायला पर्यटकांना खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागते. खासगी वाहनाने येण्यास पर्यटकांना मोठी किंमत मोजावी लागते तरी नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा अगदी किफायती दरात उपलब्ध आहे. माथेरान पर्यटकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण किफायती दराच्या प्रवासासोबतचं पर्यटकांना मिनी ट्रेनच्या विशेष प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.