मुंबई : मनीष पांचाल हे अहमदाबाद येथून मुंबईला व्यवसायाच्या कामानिमित्ताने जात होते. त्यामुळे घाईघाईत त्यांनी लोकल ट्रेनचे तिकीट काढले आणि ते पुढे रवाना झाले; मात्र दादरमध्ये उतरत असताना बॅग रेल्वेतच विसरले (Forgetting bag in train). लोकल ट्रेनमध्ये प्रवाशी त्याची बॅग विसरला असल्याची चर्चा सुरू झाली. ती बॅग कोणाची आहे, बॅगमध्ये काय आहे अशी चर्चा देखील त्यावेळेला सुरू झाली. नागरिकांनी थोडी गडबड केली. (Forgotten Bag Recovered In Mumbai) त्यामुळे दादर फलाटावर असलेल्या चीफ तिकीट इन्स्पेक्टर भाग्यश्री खोपडे यांनी पुढाकार घेऊन त्या संदर्भात तपासणी करायला सुरुवात (promptly of Railway ticket inspector) केली. (Latest news from Mumbai)
प्रवाशाला सोपविली बॅग : चीफ तिकीट इन्स्पेक्टर बागेश्री खोपडे यांनी न घाबरताना डगमगता रेल्वे पोलिसांना तिथे बोलावून घेतले आणि बॅग त्या रेल्वे डब्यातून मिळवली. ती बॅग मिळवल्यावर त्यांनी बॅगचे मालक मनीष पांचाळ यांना ती बॅग तातडीने सुपूर्त केली. या बॅगमध्ये व्यवसायाची महत्त्वपूर्ण कागदपत्रे तसेच थोडीफार रक्कम होती. प्रवासी पांचाळ यांना त्यांची हरविलेली बॅग जशीच्या तशी परत मिळाल्याबद्दल त्यांनी चीफ तिकीट इन्स्पेक्टर बागेश्री खोपडे यांचे आभार मानले. तर चीफ तिकीट इन्स्पेक्टर भाग्यश्री खोपडे यांनी सांगितले की, आम्हाला सूचना मिळाली की एका प्रवासाची बॅग त्या ठिकाणी राहिलेली आहे. या सूचनेनुसार आम्ही पटकन तिथे पोहोचल्यावर लक्षात आले की, ही बेवारस बॅग आहे.
मोटरमनने ब्रेक लावून वाचविले महिलेचे प्राण : दादर, भायखळा, सीएसएमटी सारख्या रेल्वे स्थानकांमध्ये फेरीवाल्यांकडून बळजबरी हप्ता वसुली करणाऱ्या आरोपीच्या विरोधात जीआरपी पोलिसांकडे संतोष राम प्रताप सिंह उर्फ बबलू ठाकुर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. बबलू ठाकूर याने खंडणीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशाचा वापर संपत्ती विकत घेण्यासाठी केला होता. या बरोबरच खंडणीच्या माध्यमातून मिळालेली संपत्ती ही त्याची पत्नी रिटा सिंह हिच्या नावावर करून ठेवली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी रिटा सिंह ही फरार असल्यामुळे पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. दरम्यान, नवी मुंबईत रिटा लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नवी मुंबई येथून तीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला पुन्हा दादर रेल्वे पोलीस ठाणे येथे आणत असताना रेल्वे फलाट क्रमांक 4 वरून या महिलेने उडी मारून विरुद्ध दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिचा पाठलाग करून तिला पुन्हा अटक केली आहे. दरम्यान, या महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न करताना रेल्वे फलाटावर टिटवाळा येथे जाणारी लोकल रेल्वे आली होती. मात्र, हा प्रसंग घडत असताना लोकल रेल्वेच्या मोटरमनने तत्काळ ब्रेक लावून लोकल थांबवली असता ही महिला लोकलखाली येता-येता वाचली आहे.