ETV Bharat / state

Pankaja Munde : 'मी' राजकारणातून बाहेर पडायला मागे पुढे पाहणार नाही - पंकजा मुंडे - Pankaja Munde

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते. तसेच त्या काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांनी आज नाराजी व्यक्त केली आहे. हे वृत्त प्रसारित करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde
author img

By

Published : Jul 7, 2023, 5:44 PM IST

पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद

मुंबई : भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. गेले काही दिवस पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चेला पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येऊन विराम दिला आहे. या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांनी आज मोठ्या प्रमाणात त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ज्यांनी ही बातमी प्रसारित केली त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीला त्या कंटाळल्या असून त्यांना २ महिने आराम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुंबईत त्या बोलत होत्या.

सोनिया, राहुल यांना कधीच भेटले नाही : याप्रसंगी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, २०१९ मध्ये माझा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर अनेक निर्णय झाले. त्या निर्णयाने मी नाराज आहे, मी पक्षाच्या बाहेर जाईन अशा चर्चा झाल्या. मी माझी भूमिका वेळोवेळी ठामपणे मांडली आहे. गेल्या अनेक दिवसात अनेक नेते, लोकांनी माझ्याविषयी चर्चा केल्या. पण परवा एक बातमी आली. त्यात मी सोनिया गांधी तसेच राहुल गांधींची भेट घेतल्याचे सांगितले. हे साफ चुकीचे आहे. ज्यांनी ही बातमी दाखवली त्या चॅनल विरोधात मी मानहानीचा दावा ठोकणार आहे. कारण मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी प्रत्यक्षात सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना भेटले नाही.

दोनवेळा विधान परिषदेचा फॉर्म भरायला लावला : पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, पाठीत खंजीर खुपसायला ते रक्त माझ्या शरीरात नाही. माझ्याबाबत ज्या काही बातम्या सुरू आहेत, त्याबाबत पक्षाने स्पष्ट उत्तर दिले पाहिजे. मागच्या काळात अनेकांना विधान परिषद मिळाली. पण माझे नाव नाही आले, म्हणून मी काही नाराजी व्यक्त केली नाही. भागवत कराड यांच्या यात्रेला मी हिरवा झेंडा दिला. विधान परिषदेच्या दोन्ही वेळेला मला फॉर्म भरायला सांगितले. पण मी काही नाराजी व्यक्त केली नाही. मी कधी कोणाचे नावही घेतले नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

खातो नथी खावाणो देतो नथी : पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाक्य नेहमी आठवते. त्यात ते म्हणतात, "खातो नथी खावाणो देतो नथी" यामुळे मला त्यांचे विचार फार आवडतात. सध्या शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही. पण पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांची भाजप तशीच राहावी, अशी माझी इच्छा आहे. मी कोणत्याही पक्ष नेत्याशी माझ्या प्रवेशाबाबत आद्याप भेटलेली नाही. मला प्रचंड दुःख आहे. सध्या आपल्या चर्चा कुठे चालल्या आहेत. ड्रग्स सहज मिळत आहेत, महिलेवर आत्यचार होतो, हे कोणाचे अपयश आहे?. सध्या मी प्रचंड गोंधळलेली आहे. मला आराम करण्याची आवश्यकता आहे. मी राजकारणातून बाहेर पडायला मागे पुढे पाहणार नाही. पण मी आता एक ते दोन महिने सुट्टी घेणार आहे.

भाऊ मंत्री झाला तर, त्याचा जास्त आनंद : धनंजय मुंडे चार दिवसांपूर्वी मला भेटायला आले होते. ते मंत्री झाले म्हणून मी त्यांचे औक्षण केले. इतर कोणी मंत्री होत असेल त्यापेक्षा माझा भाऊ मंत्री झाला तर, त्याचा जास्त आनंद आहे. पण त्यांनी तो फोटो आज का ट्विट केला मला माहीत नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा - Pankaja Munde News: दोन महिने सुट्टी घेणार, अंतर्मुख होऊन निर्णय घेणार -पंकजा मुंडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.