ETV Bharat / state

नाशिकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही उभारणार ऑक्सिजन पार्लर; मध्ये रेल्वेचा उपक्रम

author img

By

Published : Dec 18, 2019, 6:40 PM IST

मध्य रेल्वे विभागात रोप वाटिका (ऑक्सिजन पार्लर) उभारण्यात येणार आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक रोड स्थानकापासून झालेली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही अशी रोप वाटिका उभारण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक १७ हजार रुपयाचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

mumbai
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

मुंबई - मध्य रेल्वे विभागात रोप वाटिका (ऑक्सिजन पार्लर) उभारण्यात येणार आहे. या पार्लरमध्ये ऑक्सिजन देणारे रोपटे तयार करून त्याची विक्री करण्यात येईल. यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. नासाकडून मान्यता प्राप्त रोपटे या रोप वाटिकेतून विक्री करण्यात येणार आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक रोड स्थानकापासून झालेली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही, अशी रोप वाटिका उभारण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक १७ हजार रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

माहिती देताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार

महसूल वाढविण्यासाठी मध्य रेल्वे नव-नवीन कल्पना राबवत असते. यावेळी मध्य रेल्वेने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विभागातील रेल्वेस्थानकांवर ऑक्सिजन वाटिका लावण्याची योजना आखली आहे. या योजनेची सुरुवात मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकापासून झाली आहे. या रोप वाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (नासा) कडून मान्यता प्राप्त १८ प्रकारचे सर्वाधिक ऑक्सिजन देणारी रोपटी लावण्यात आली आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण स्नेही वातावरण प्रवाशांना मिळणार आहे. या रोप वाटिकेतून प्रवाशांना साधारण २०० ते ५०० रुपयांपर्यत रोपटे विकत घेता येईल. भारतीय रेल्वेचे उत्पादन वाढविण्यासाठी 'न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम' (एनआयएनएफआरआयएस) मार्फत अनेक योजना आखल्या जात आहे. त्यातील हा एक उपक्रम आहे.

दरम्यान, प्रवाशांना रोप वाटिकेतून योग्य दरात रोपटे विकत घेता येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. नाशिकनंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरसुद्धा ऑक्सिजन पार्लर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वे जागेची पहाणी सुरू आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर सुरू झाल्यावर मुंबईतील प्रवाशांना देखील रोपटे विकत घेता येणार आहे.

हेही वाचा- '...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'

Intro:
मुंबई - मध्य रेल्वे विभागात रोप वाटिका (ऑक्सिजन पार्लर)उभारण्यात येणार आहे. या पार्लरमध्ये ऑक्सिजन देणारे रोपटे तयार करून त्याची विक्री करण्यात येईल. यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. नासाकडून मान्यता प्राप्त झालेल्या 18 प्रकारे रोपटे विक्री करण्यात येणार आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक रोड येथे सुरू करण्यात आली. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक 75 हजार रुपयाचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.
Body:मध्य रेल्वे महसूल वाढविण्यासाठी नवीन नवीन कल्पना राबविते. मध्य रेल्वेने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक महत्वपूर्ण योजना आखली आहे. हवा शुद्धीसाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लरची सुरुवात मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकांत सुरु होईल. या रोप वाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन,( नासा ) कडून मान्यता प्राप्त 18 प्रकारचे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे रोपटे उपलब्ध असतील. त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण स्नेही वातवरण प्रवाशांना मिळेल. या रोप वाटिकेतून प्रवाशांना रोपटे साधारण 200 ते 500 रुपयांपर्यत विकत घेता येईल. भारतीय रेल्वेचे उप्तादन वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) मार्फत अनेक योजना आखत आहे. त्यातील हा एक उपक्रम आहे.
रेल्वे स्थानकांत पर्यावरण स्नेही वातवरण निर्माण करण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर सुरु करत आहे. या पार्लरमध्ये जास्त ऑक्सिजन देणारे रोपटे असणार आहे. ते प्रवाशांना सुद्धा मुभलक दरात विकत घेता येणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
नाशिकनंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुद्धा ऑक्सिजन पार्लर सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वे जागेची पाहणी करत आहे. लवकरच सीएसएमटी रेल्वे स्थानकात सुद्धा प्रवासी ऑक्सिजन पार्लरमधून रोपटे विकत घेऊ शकतील.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.