ETV Bharat / state

कोरोनाचं महासंकट अन् महाराष्ट्रातील ऑक्सिजनची परिस्थिती - Oxygen conditions in Maharashtra during corona crisis

राज्यात काही ठिकाणी पुरेसा ऑक्सिजन आहे तर काही ठिकाणी अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत 'ईटीव्ही भारत'ने राज्यातील कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालये, कोविड सेंटर्समधील ऑक्सिजनची परिस्थिती कशी आहे? याबाबत घेतलेला आढावा.

Oxygen conditions in Maharashtra
महाराष्ट्रातील ऑक्सिजनची परिस्थिती
author img

By

Published : Sep 19, 2020, 10:08 PM IST

देशासह राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११ लाखांच्या वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांची संख्याही 30 हजारांच्या वर पोहोचली आहे. काही ठिकाणी पुरेसा ऑक्सिजन आहे तर काही ठिकाणी अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत 'ईटीव्ही भारत'ने राज्यातील कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालये, कोविड सेंटर्समधील ऑक्सिजनची परिस्थिती कशी आहे? याबाबत घेतलेला आढावा.

  • भंडारा - सध्या जिल्ह्यात एका दिवशी 275 क्युबिक मीटर ऑक्सिजनची आवश्यकता भासत असून ती पूर्ण होत आहे. जिल्ह्याला लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा नागपूरवरुन केल्या जात आहे. दररोज नागपूरला सिलेंडर रिफिल करण्यासाठी जात असतात. सध्या नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पहिले नागपूरचे सिलेंडर रिफील केले जातात नंतरच भंडारा जिल्ह्यांना सिलेंडर रिफिल करून मिळतात. भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने 200 नवीन खाली सिलेंडर खरेदी केले आहेत. आता जुने आणि नवीन सिलेंडर मिळून सर्व सिलेंडरची रिफिलिंग आता भंडारा जिल्ह्यातच होणार आहे. यासाठी भंडारा स्थित सनफ्लॅग या खासगी कंपनीला ऑक्सिजन निर्मितीचे आदेश देण्यात आलेले आहेत.
  • धुळे - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत असताना जिल्ह्यात सध्या स्थिती दोन पुरवठादारांकडून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा सध्या सुरळीत सुरू आहे. मात्र, भविष्यातील वाढती रुग्णसंख्या बघता तसेच ऑक्सिजनचा पुरवठा लक्षात घेता पुरवठादारांची संख्या वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार 388 वर गेली आहे. सद्यस्थितीत 1 हजार 60 जणांवर उपचार सुरू आहेत.
  • जळगाव - जिल्ह्यात दररोज सुमारे 2 हजार 400 ते 2 हजार 600 ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज भासत आहे. मात्र, राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मेडिकल ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून अत्यावश्यक घटक असलेल्या लिक्विड ऑक्सिजनचा गरजेनुसार पुरवठा होत नाहीये. त्यामुळे ऑक्सिजन उत्पादकांनी मागणीनुसार पुरवठा करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विचार केला तर आवश्यक तेवढा ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी 20 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यासाठी अवघा 12 ते 14 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे रिफिलिंग प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत.

जळगाव जिल्ह्यासाठी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. मात्र, जिल्ह्यासाठी 20 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन आवश्यक असताना अवघा 12 ते 14 मेट्रिक टन पुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्याची गरज 2400 ते 2500 सिलिंडरची असताना अवघे 1700 ते 1800 सिलिंडरची निर्मिती होत आहे. म्हणजेच 500 ते 600 सिलिंडरचा दररोज तुटवडा आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यासाठी 2 ऑक्सिजन टँकरद्वारे लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. टँकरच्या आपत्कालीन परिस्थितीला पर्याय म्हणून दुसरी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोविड रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा टॅंक उभारण्यासाठी 2 मक्तेदारांनी निविदा भरल्याची माहिती मिळाली.

  • कोल्हापूर - जिल्ह्यात कोल्हापूर ऑक्सिजन कागल, के नायट्रोजन प्रायव्हेट लिमिटेड शिरोली, महालक्ष्मी गॅसेस यड्राव इचलकरंजी, देवी इंडस्ट्रियल गॅस गोकुळ शिरगाव आणि चंद्र उद्योग शिरोली अशा पाच ऑक्सिजन उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या कंपनी आहेत. या सर्व कंपन्या 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अधिग्रहीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केवळ वैद्यकीय कारणासाठी या सर्वच कंपन्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. कारण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या वैद्यकीय कारणासाठी 40 ते 50 हजार लिटर ऑक्सिजनची दररोज आवश्यकता आहे. तितक्याच ऑक्सिजनचा पुरवठाही सुरू आहे. एखाद्या दिवशी गरज भासल्यास बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा ऑक्सिजन मागविला जात आहे. सध्या कोल्हापूर ऑक्सिजन कंपनीच्या दोन टँकरद्वारे ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे.
  • राजगुरुनगर (पुणे) - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पाहता ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण होत आहे. काही ठिकाणी ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना उपचार घेत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये दोन कंपन्यांमध्ये ऑक्सीजन उत्पादन सुरू आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या कंपनी ऑक्सिजनचे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या 11 कंपन्या आहेत. त्यांची उत्पादन क्षमता साडे आठ हजार मेट्रिक टन आहे. त्यापैकी तीन कंपन्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये आहेत. यातून दोन कंपन्यांमधून ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जाते. तर फ्रान्स येथील चाकण औद्योगिक वसाहतीमधील एअर लिक्विड कंपनीत 200 टन ऑक्सिजन निर्मितीचा प्रयोग तयार आहे. या कंपन्यांच्या परवानग्या 15 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण होऊन ऑक्सिजनचे उत्पादन पूर्ण क्षमतेने घेतले जाणार आहे.

  • पुणे - शहरातील रुग्णालयात शेजारील जिल्ह्यासह राज्याच्या इतर भागातून ही मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण 30 टक्के आहे. यामुळे पुणे शहरात सध्या एकूण 961 चिंताजनक रुग्ण उपचार घेत आहेत तर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 523 इतकी जास्त असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही मोठी समस्या प्रशासनावर समोर आहे. जिल्ह्यात दोन लिक्विड ऑक्सिजन उत्पादक आहेत. त्यांच्याकडून 270 मेट्रिक टन दररोज पुरवठा होतो आहे. जिल्ह्यासोबत विभागातही या उत्पादकांकडून पुरवठा केला जातो. दररोज विभागाची एकूण ऑक्सिजनची गरज ही 350 मेट्रिक टन इतकी आहे. त्यामुळे 100 मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा हा भासत असल्याने ठाणे जिल्ह्यातील 2 ऑक्सिजन उत्पादकांकडून हा तुटवडा प्रशासन भरुन काढत आहे.

ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी दररोज 30 टँकरची ये-जा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या ऑक्सिजन उत्पादकांकडून पुण्यातील दीनानाथ, रुबी, सह्याद्रीसारख्या मोठ्या रुग्णालयांसोबत जम्बो कोविड सेंटरलाही थेट पुरवठा केला जातो. विभागात 27 रिफील्स आहेत. यातील 11 रिफील्स हे पुणे जिल्ह्यातील आहेत. या रिफिल्सला सुद्धा उत्पादक कंपन्या ऑक्सिजन पुरवठा करतात.

  • अमरावती - अमरावती जिल्ह्यात दररोज 12 मेट्रिक टन (दोन टँकर) इतका ऑक्सिजन लागत आहे. तो दोन पुरवठादारांच्या माध्यमातून पुरविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 443 वर पोहोचली आहे. यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 304 आहे. तर 427 जणांना ऑक्सिजन लावले आहे.
  • सांगली - जिल्ह्यातील ऑक्सिजनची टंचाई कायम आहे. मागणीच्या निम्माच पुरवठा होत असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे बेड उपलब्ध असूनही ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. जिल्ह्यात रोज 6 लाख लिटरच्या सहा कंटेनर इतकी ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, तुलनेने कमी पुरवठा होत आहे. सांगली जिल्ह्यात ऑक्सिजन प्लँट नाही. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिन्नर तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव आणि गुलबर्गा येथून ऑक्सिजन पुरवठा होत आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 111 कोरोना रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व रुग्ण वेगवेगळ्या पद्धतीने ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
  • परभणी - जिल्ह्याला सध्य परिस्थितीत 450 ते 500 ऑक्सीजन सिलेंडरची आवश्यकता आहे. सध्या तरी ही मागणी पूर्ण होत आहे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. परभणी जिल्ह्यातील तालुका व शहरी भागात असलेल्या 29 सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या 29 ठिकाणी तब्बल 1 हजार 693 बेडची उपलब्धता आहे. सध्या यातील 779 बेडवर रुग्ण उपचार घेत असून, 914 बेड रिकामे आहेत. यातील 1 हजार बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सीजन पुरवण्याची सुविधा करण्यात आली आहे. यातील दररोज 450 ते 500 रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते. यासाठी परभणी जिल्ह्याला औरंगाबाद आणि जालना या ठिकाणाहून ऑक्सीजनचा पुरवठा होतो. हे ऑक्सिजन साठविण्यासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात एक किलो लिटर क्षमता असलेले चार ऑक्सिजनचे टँक बसविण्यात आले आहेत. या टँकमध्ये सध्या ऑक्सिजनचा मुबलक साठा आहे. तर 1 हजार 600 जम्बो सिलेंडर देखील उपलब्ध आहेत. एकूणच पुढील आठवडाभर पुरेल असा ऑक्सिजनचा साठा परभणीत सध्यातरी उपलब्ध आहे.

तसेच 'दररोज पाठपुरावा करून आम्ही जालना आणि औरंगाबाद या ठिकाणाहून शंभर-दोनशे जम्बो सिलेंडर आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत नाही, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागरगोजे म्हणाले. दरम्यान, विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी तालुक्यातील शहापूरच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली होती. त्या रुग्णानेच मृत्यूपूर्वी केलेल्या एका व्हिडिओमधून ही बाब पुढे आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी समिती नेमली आहे. मात्र, अद्यापही त्या समितीचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

  • बुलडाणा - जिल्ह्यात एकूण 406 खाली जंबो ऑक्सिजन सिलेंडर आहेत. तर 29 लहान ऑक्सिजन सिलेंडर आहेत. त्यापैकी 195 जंबो ऑक्सिजन सिलेंडरची व 17 लहान ऑक्सिजन सिलेंडरची मागणी करण्यात येत आहे. मात्र, 135 जंबो आणि 17 लहान ऑक्सिजन सिलेंडर मिळत आहे. जिल्ह्याला अकोला येथील माऊली उद्योग हे ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करीत आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी सागर गॅस एजन्सी औरंगाबाद येथुन ऑक्सिजन सिलेंडर बोलविण्यात येते. बुलडाण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा करणारे टँकर नाही. सध्या आयसीयूमध्ये 14 रुग्ण, 5 रुग्ण व्हेंटिलेटरवर, 9 रुग्ण ऑक्सिजनवर आहे. तर 33 रुग्ण आयसीयूच्या बाहेर असून ऑक्सिजनवर आहे.
  • गडचिरोली - जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठादार एकच आहे. तो नागपूरचा आहे. ऑक्सिजन पुरवठा करणारे टँकर्स नाही तर मोठे, मध्यम व लहान अशा तीन स्वरुपात सिलिंडर ऑक्सिजनचा पुरवठा होतो. जिल्ह्यात मोठे ऑक्सिजन सिलिंडर 600, मध्यम 425 तर लहान 325 आहेत. सध्या जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा सुरळीत सुरु आहे. सिलिंडर संपत आले की लगेच पुरवठा होतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
  • पालघर - जिल्ह्यात पालघर ग्रामीण आणि वसई-विरार मनपा असे दोन विभाग आहेत. पालघर ग्रामीण हा विभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येतो. कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता जिल्ह्यातील ग्रामीण भागात चार उपचार डेडिकेटेड कोविड सेंटर कार्यरत आहेत. यात एकूण 1 हजार 140 ऑक्सिजन खाटा आहेत. तर 324 खाटा रिकाम्या आहेत. ग्रामीण भागात 0.5 मॅट्रिक इतकी ऑक्सिजनची आवश्यकता दररोज भासते. त्यानुसार 7 क्युबिक क्षमतेच्या 100 जम्बो सिलेंडरने ऑक्सिजन पुरवठा केला जातो.

जिल्ह्यात वाडा (कुडूस) आणि बोईसर येथे दोन्ही मिळून 10 मेट्रिक टन क्षमतेचे रिफिलींग युनिट कार्यरत आहेत. येथून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. ऑक्सिजन पुरवठा संदर्भात रोज संध्याकाळी रुग्णालयातून माहिती घेतली जाते. त्याप्रमाणे पुढचे 24 तास अधिक पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करुन ठेवण्यात येतो, अशी माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.

तर वसई-विरार मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरासरी 3 ते 4 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठ्याची गरज भासते. मनपा क्षेत्रातील रुग्णालयांना नालासोपारा येथील दोन रिफिलिंग युनिट व वाडा (कुडूस) येथून ऑक्सिजन पुरवठा केला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.