मुंबई - पीएम केअरमधून मिळालेल्या 4 हजार 127 व्हेंटिलेटरपैकी केवळ 332 व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले. तर, शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी 250 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार कोकण-नुकसानग्रस्त भागाचा दौरा
राज्यासाठी पीएम केअर फंडातून यावर्षी 4 हजार 127 व्हेंटिलेटर आले. त्यापैकी 3 हजार 795 व्हेंटिलेटर सुस्थितीत आहेत, तर 332 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 332 व्हेंटिलेटरमध्ये काही तांत्रिक बिघाड असून, हे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी व्हेंटिलेटरच्या टेक्निशियनची गरज आहे. टेक्निशियनचा अभाव हा नादुरुस्तीचा कारण असावा. त्यामुळे, व्हेंटिलेटर दुरुस्तीसाठी टेक्निशियनची टीम तयार करण्याची गरज असून त्याच्या माध्यमातून व्हेंटिलेटर दुरुस्त होण्यास मदत होईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच, पीएम केअर फंडातून जे व्हेंटिलेटर राज्याला मिळाले आहेत त्यापैकी बहुतांश व्हेंटिलेटर हे सुस्थितीत असून राज्यातील रुग्णालयांमध्ये त्या व्हेंटिलेटरद्वारे रुग्णांवर उपचार सुरू असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी देखील शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयांना जवळपास अठराशे व्हेंटिलेटर मिळाले असून त्यापैकी 250 व्हेंटिलेटर हे नादुरुस्त असून, हे व्हेंटिलेटर लवकरात लवकर दुरुस्त व्हावेत म्हणून व्हेंटिलेटर बनवणाऱ्या संबंधित कंपनीला कळवण्यात आले असल्याची माहिती दिली.
हेही वाचा - Corona Update : राज्यात गुरुवारी 47 हजार 371 जण कोरोनामुक्त; 29 हजार 911 नवे बाधित