मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने विधिमंडळातील पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे विधिमंडळातील प्रतोद भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक पार पडली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतल्याचे गोगावले म्हणाले. येत्या २७ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भूमिका ठरवण्यात आली. अधिवेशन काळात प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना पक्षादेश बजावतो. शिवसेना शिंदे गट ही धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांना व्हीप बजावणार आहे, असे गोगावले यांनी सांगितले.
५६ आमदारांना व्हीप लागू होणार : अद्याप व्हीप काढलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर लवकरच तो बजावला जाईल. शिवसेना पक्षाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्वांना तो स्विकारावा लागेल. तो न स्विकारल्यास कारवाई होईल, असे गोगावले म्हणाले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना व्हीप लागू होईल का, असे प्रश्न विचारण्यात आला असता, ५६ आमदारांना तो लागू असेल. मग ठाकरे असो किंवा शिंदे सर्वांना लागू होईल, असे स्पष्टीकरण गोगावले यांनी दिले. व्हीप न बजावल्यास काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला असता, व्हीप मान्य करायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणार असे सांगत गोगावले यांनी बाजू मारली.
मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा : राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिमंडळ विस्तार व रखडला आहे. सत्ता स्थापनेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मंत्रिमंडळ विस्तार यामुळे रखडला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील. येत्या कॅबिनेट बैठकीनंतर या संदर्भात चर्चा होणार असल्याचेही गोगावले म्हणाले.
शिवसेना संपवण्याचे काम राऊतांचे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त संविधानामुळे संजय राऊत यांना अपात्र करण्याबाबत शिंदे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावर ही गोगावले यांनी भाष्य केले. संजय राऊत चांगले काम करत आहेत. उद्धव ठाकरेंना संपवण्याचे काम करत आहेत. आमचं काम यामुळे सोपं होत आहेत. त्यांच्यावर कारवाईबाबत खासदार व वरिष्ठ ठरवतील पातळीवर निर्णय होईल, असे गोगावले यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांविषयी गेलेल्या विधानाप्रकरणी दोन गुन्हे झालेत अजून गुन्हे नोंद होणे बाकी आहेत. राऊतांना आमचे कार्यकर्ते उत्तर देतील, असा सूचक इशारा दिला.
पार्टी फंड महत्त्वाचा नाही : शिवसेना पक्षाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी बैठक बोलावली होती. अधिवेशनातील चहापान कार्यक्रमाला व पूर्ण वेळ सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदार संघातील कामे आमदारांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन करण्यात आले. लवकरच सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल. प्रतोद यांच्या आदेश सर्वांनी पालन करावे. पालन न झाल्यास कारवाई होईल शिवसेनेच्या ५६ आमदारांसाठी लागू होईल, असे आमदार. प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच आमच्यासाठी पार्टी फंड हा महत्वाचा नाही. पक्षाचे नाव व चिन्ह हे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
संजय राऊत पिसाळलेला कुत्रा : शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदीर आहे. आम्ही कधीच त्याच्यावर दावा केला नाही. ज्यांना पैशाचा लोभ आहे त्यांची ती प्राॅपर्टी आहे. पक्ष किंवा ट्रस्टकडून शाखा नाहीत. शिवसैनिकांमध्ये वाद होणार नाहीत, असे आमदार संजय शिरसाट म्हणाले. तसेच संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राऊताच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्याच्यावर बोलायचं नाही. त्याच्यावर अपात्रतेची कारवाई कशी होईल हे आम्ही बघत आहोत. मुख्यमंत्री याच्यावरते काय भाषा वापरतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल ही झालेले आहेत. राऊतांना ८ दिवसात उत्तर देऊ, असा इशारा शिरसाट यांनी दिला. तसेच संजय राऊत यांचा उल्लेख पिसाळलेला कुत्रा असल्याची आक्षेपार्ह टीका केली.
हेही वाचा : What Did Thackeray lose : ठाकरे आता पक्षनिधी आणि कार्यालय ही गमावणार?