मुंबई: शिवसेनेतील फुटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजित पवारांनी सुरुंग लावला. (Guru Balasaheb Thackeray) महायुतीच्या सरकारमध्ये त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. (Guru Poornima festival on Matoshree) शपथविधी नंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Uddhav Thackeray appeal about Guru) राज्यात राजकीय वातावरण देखील त्यानंतर ढवळून निघाले आहे. राज्यातील घडामोडी वाढल्या (Maharashtra Political Crisis) असतानाच आज गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी शिवसैनिकांनी गर्दी करत उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतले. ठाकरेंनी यावेळी शुभेच्छा देत शिवसैनिकांची मने जिंकली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आपण सगळे मिळून माननीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक होत आहोत. आपल्या सर्वांचे बाळासाहेब हे एकच गुरू आहेत. मी सुद्धा तुमच्यामधीलच असून तुमचा गुरू नाही. तुमच्याप्रमाणेच मी देखील बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक होतो आहे. त्यामुळे नतमस्तक व्हायचे असेल तर बाळासाहेब ठाकरेंच्या समोर व्हा. तसेच शिवसेना आपला परिवार असून तो मजबूत ठेवा, असे आवाहन ठाकरेंनी केले.
उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन: अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 40 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. जवळपास 40 आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचे यावेळी पवार म्हणाले. अजित पवार यांच्या या निर्णयानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्री तसेच नेते मंडळी यांचे फोन आले असून त्यांनी देखील शरद पवार यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनचाही समावेश आहे.
तिसरा सर्वांत मोठा भूकंप: शिंदे सरकारला 30 जूनला वर्ष पूर्ण झाले. सरकारची वर्षपूर्ती होताच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावा भाजप-शिंदे गटाकडून करण्यात येत होता. मंत्री पदासाठी शिंदे गटातील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र, अचानक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आठ आमदारांना सोबत घेऊन मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणातला हा तिसरा सर्वांत मोठा भूकंप आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी या बंडखोरीवर मार्मिक प्रतिक्रिया दिली. पुण्यात कोयता हल्ला प्रकरणात तरुणीला वाचवणाऱ्या तरुणांचा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नव्या राजकीय घडामोडींवर ठाकरेंना विचारले असता नांदा सौख्य भरे, अशी खोचक टीका केली. ठाकरे यांच्या या टीकेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा:
- NCP Political Crisis : शरद पवारांसोबत राष्ट्रवादीची यंगब्रिगेड; ज्येष्ठांची फळी मात्र....
- Maharashtra Political Crisis : अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष बदलला, म्हणाले, 'राष्ट्रीय अध्यक्ष...'
- Maharashtra Political Crisis: साहेब सांगतील तेच धोरण, अमोल कोल्हेंची स्पष्टोक्ती, २४ तासाच्या आत शरद पवारांच्या गोटात पुन्हा दाखल