मुंबई : आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो हा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर येथे सुरू झाला आहे. कोविड महामारी नंतरचा हा पहिलाच ट्रेड शो आहे. तसेच, आतापर्यंतचा आशियातील हा सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो आहे. यामध्ये ५० देशांतील १२५० पेक्षा अधिक प्रदर्शक आणि भारतातील ३० राज्यातील ३० हजार पेक्षा अधिक पूर्व पात्र खरेदीदार यांनी यात भाग घेतला आहे. यामध्ये संपूर्ण भारतातून १ हजारपेक्षा जास्त व्हीआयपी आणि खरेदीदार सहभागी झाले आहेत. २ लाख ५० हजारापेक्षा जास्त स्क्वेअर फुट कव्हर करणारा हा सर्वात मोठा ट्रेड शो आहे. गेल्या काही वर्षातील साथीच्या आजारांशी संबंधित व्याधीनंतर जागतिक प्रवासी व्यवसाय पूर्ण जोमाने परत येण्याची साक्ष असणारा हा शो आहे. अनेक देशांच्या समावेशाने येथील ओटीएमवर रंगीबेरंगी मंडप उभारले गेले आहेत. या कार्यक्रमात रामोजी ग्रुपनेही आपला सहभाग नोंदवला आहे.
पर्यटन बाजार २०२४ पर्यंत ४२ अब्ज USD च्या पुढे? : आसाम, बिहार, दमण आणि दीव, दिल्ली, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटन मंडले, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि इतर अनेक राज्यातील पर्यटन व्यवसायाच्या प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला आहे. भारतीय ट्रॅव्हल मार्केट पर्यटन वळणाच्या बिंदूवर आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारांपैकी एक ते आहे. २०२५ पर्यंत, (Expedia)च्या अहवालानुसार भारतातून १३.९ दशलक्ष अवकाश निर्गमन अपेक्षित आहे. ज्यामुळे १९.४ दशलक्ष भारतीय पर्यटक परदेशात येतील, ज्यामध्ये टियर २आणि टियर ३ शहरांचा मोठा वाटा आहे. आउटबाउंड ट्रिपपैकी २६ टक्के व्यवसाय प्रवासाचा वाटा आहे. ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या व्यावसायिक प्रवासी बाजारपेठांपैकी एक बनला आहे. भारतीय आउटबाउंड पर्यटन बाजार (२०२४)पर्यंत ४२ अब्ज USD च्या पुढे जाण्याचा अंदाजसुद्धा वर्तवला जात आहे.
खर्च केलेला प्रत्येक पैसा योग्य आहे : या ट्रेड शो बाबत बोलताना OTM 2023 फेअरफेस्ट मीडिया लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष संजीव अग्रवाल सांगतात की, ओटीएम (२०२३) हा
पोस्ट-पँडेमिकमध्ये अग्रगण्य ट्रॅव्हल ट्रेड शो म्हणून उदयास आला आहे. संपूर्ण भारतातील आणि परदेशातील प्रवासी समुदायाच्या प्रचंड पाठिंब्यामुळे जे देश भारतीय पर्यटकांना स्वीकारण्यास तयार आहेत. तसेच, ज्यांनी प्रवासाची खूप गरज दाखवली आहे. विशेषतः कोरोना महामारीनंतर सर्वच क्षेत्रासा मोठा फटका बसलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच सावध झालेले आहेत.
हेही वाचा : गडकरी फडणवीसांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबालेंचा दणदणीत विजय