ETV Bharat / state

Many Bridges Construction Started : मुंबईत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुलांची कामे सुरु, महापालिका सक्रिय - पुलांची कामे सुरु

मुंबईमध्ये वाढती वाहने, अरुंद रस्ते, कशाही पद्धतीने केली जाणारी पार्किंग, जागोजागी असलेले सिग्नल, धोकादायक पूल, यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक (order to break traffic jam in Mumbai) कोंडी होते. यामुळे महापालिका प्रशासनाने (Municipal Corporation) मोठ्या प्रमाणात पुल बांधण्याचे कार्य (Many Bridges Construction Started) हाती घेतले आहे.

Many Bridges Construction Started
महापालिका सक्रिय
author img

By

Published : Nov 20, 2022, 7:24 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये वाढती वाहने, अरुंद रस्ते, कशाही पद्धतीने केली जाणारी पार्किंग, जागोजागी असलेले सिग्नल, धोकादायक पूल, यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक (order to break traffic jam in Mumbai) कोंडी होते. मुंबईमध्ये ३१४ हुन अधिक पूल बांधण्यात आले आहेत. त्यापैकी २९ पूल अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. हे धोकादायक पूल पाडून त्याठिकाणी नवे पूल बांधण्यास पालिकेने (Municipal Corporation) सुरुवात केली आहे. तर १८४ पुलांची डागडुजी केली जात आहे. मुंबईमध्ये १२ पूल केबल आधारित बांधले जाणार आहेत. लेझर लाईट आणि सौंदर्यीकरण यामुळे पुलांचे सौंदर्यात भर पडणार आहे. पूल नवे बांधल्याने (Many Bridges Construction Started) मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

मुंबईत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुलांची कामे सुरु

मुंबईतील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट : अंधेरी येथील गोखले पूल २०१८ मध्ये तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल २०१९ मध्ये पडला होता. या दुर्घटनांनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. मुंबईत एकूण ३१४ पूल असून, बहुतांशी पूल जुने ब्रिटीशकालीन असल्याने यातील २९६ पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये मुंबई शहर विभागात ८१, पूर्व उपनगरात ९० आणि पश्चिम उपनगरात १४३ पूल आहेत. यात एमएमआरडीएने २३ स्कायवॉक पालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. ऑडिटमध्ये ३१४ पैकी २९ पूल अतिधोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला. तर १८४ पुलांची छोटी - मोठी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे अहवालात सूचवण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे काम सध्या सुरु असल्याचे पालिकेच्या पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितले.

गोखले पुलाचे काम सुरु : अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या येथील गोखले पुलाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या पुलाचे काम करताना पालिकेच्या अखत्यारीतील टप्प्याचे २६५ मीटरचे काम हे पहिल्या टप्प्यात अपेक्षित होते. तर दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये रेल्वेच्या अखत्यारीतील आणि दुसऱ्या लेनचे काम होणार होते. या दोन्ही कामासाठी साधारणपणे चार वर्षांचा कालावधी अपेक्षित होता. परंतु पुलाच्या तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या एससीजी कन्सलटन्टने दिलेल्या अहवालाने या कामाला वेग आला आहे. सल्लागाराने चार वर्षाचे काम दोन वर्षात करण्याचा सल्ला दिल्याने आता दोन्ही टप्प्यातील काम एकत्रितपणे केले जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १६१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुल तातडीने पाडण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये अंधेरीच्या गोखले पुलावर एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली.

हिमालय पूल ६ महिन्यात तयार : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल १४ मार्च २०१९ मध्ये कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षात या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. यामुळे रेल्वे प्रवासी आणि येथील स्थानिकांना रस्ता ओलांडून प्रवास करावा लागत आहे. मात्र आता पुढील सहा महिन्यात हा पूल प्रवाशांच्या सेवेत असेल. लोखंडी पुलाला पावसाळ्यात गंज पकडतो. यासाठी आता हिमालय पूल स्टेनलेस स्टीलचा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सीएसएमटी स्थानकातून १ नंबर प्लॅटफॉर्मवरून ठाणे बाजूने बाहेर आल्यावर, आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. याचा उपयोग जेष्ठ नागरिकांसह गरोदर महिलांना होईल. पुलाच्या पिलर उभारण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर स्टेनलेसस्टिलचा गर्डर बनवला जाणार आहे. हा गर्डर आणून पिलरवर ठेवला जाणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

१२ पूल केबल आधारित : मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासन १०० ते १२७ वर्षे जुने पूल पाडत त्या जागी केबल आधारित पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका प्रशासन तब्बल १,७७५ कोटी रुपये खर्च करणार आहे. या पुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वे करणार असल्याचे पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या पुलांचे काम २०२२ पासून टप्याटप्याने सुरु करण्यात येणार असून, २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामामुळे रस्ते वाहतूक व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार नाही. आकर्षक स्वरूप, लेझर लाईट यामुळे पुलाचे सौंदर्यीकरण वाढणार आहे. मोठ्या पुलांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. बांधकामाच्या वेळीही वाहतूक सुरळीत राहणार आहे. केबल स्टेड पद्धतीमुळे मजबूत बांधकाम असणार आहे. पूल उभारण्याच्या कामादरम्यान पायासाठी कमी जागा लागल्याने मोकळी जागा वाढणार आहे. रे रोड ब्रीजसाठी १७५ कोटी, टिळक ब्रीज दादरसाठी ३७५ कोटी, भायखळा ब्रीजसाठी २०० कोटी, घाटकोपर ब्रीजसाठी २०० कोटी, बेलासीस मुंबई सेंट्रल पुलासाठी १५० कोटी, आर्थर रोड ब्रीजसाठी २५० कोटी, सेंट मेरी माझगावसाठी ७५ कोटी, करी रोड ब्रीजसाठी ५० कोटी, मांटुगा ब्रीजसाठी ५० कोटी, एस ब्रीज भायखळासाठी ५० कोटी, लोअर परळ ब्रीजसाठी १०० कोटी, महालक्ष्मी ब्रीजसाठी १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

महालक्ष्मी पुलाचे बांधकाम सुरु : महालक्ष्मी पुलाचे बांधकाम सुरु असून पूर्व व पश्चिमेला जोडण्यात येणार आहे. केबल आधारीत होणाऱ्या पुलाचा विस्तार होणार असून, एन.एम. जोशी मार्ग जंक्शन ते एस ब्रीज जंक्शन अर्थात गंगाराम तळेकर चौकापर्यंत जोडला जाणार आहे. तसेच हाजी अली जंक्शन जवळील महालक्ष्मी रेसकोर्स वाहनतळामधून एक मार्गिकेचे बांधकाम या केबल स्टेड पुलाला जोडली जाणार आहे. या विस्तारीत पुलांच्या बांधकामावर पालिका सुमारे १२० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. दरम्यान, केबल आधारीत पुलासाठी याआधी ७५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

गोरेगाव खाडीवर केबल पूल : अंधेरी पश्चिम व गोरेगाव पश्चिम दरम्यान गोरेगाव खाडीवर केबल आधारित पूल बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, चार लेनचा पूल असणार आहे. या कामासाठी तब्बल ४१८ कोटी ५३ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने निविदा मागवल्या आहेत. दरम्यान, हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अंधेरी ते गोरेगाव दरम्यानची वाहतूक कोंडी फुटणार आहे.

परेल पुलाची डागडुजी : दक्षिण मुंबईतील परळ आणि प्रभादेवी अशाप्रकारे पूर्व पश्चिम जोडणारे रेल्वे पूल हे १९६८ मध्ये बांधण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामाला ५५ वर्षे पूर्ण होत असून, या पुलावर १० मीटर अंतरावर पसरण सांधे बसवण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण २२ पसरण या पुलावर आहेत. सततच्या वाहतुकीमुळे पडणारे खड्डे लक्षात घेता महापालिकेच्यावतीने याची नियमित देखभालीच्या दृष्टीकोनातून पसरण सांध्यांसह इतर भागांची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यासाठी एम ई इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

१५७६ कोटींची तरतूद : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल, फुट ओव्हर ब्रीज आणि रस्त्यावर नवीन पूल बांधले जाणार आहेत. पुलांच्या बांधकामासाठी पालिकेने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १५७६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.