मुंबई - वाडिया रुग्णालयाच्या भूखंडावर बड्या अधिकाऱ्यांचा डोळा असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या रुग्णालयातील अनुदान रोखणाऱ्या अधिकार्यांची चौकशी करा, अशी मागणी शुक्रवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
हेही वाचा - मुंबईत 26 जानेवारीपासून 'नाईट लाईफ'
जर या ठिकाणी राज्य सरकार असेल किंबहुना महानगरपालिका असेल यांना वाडिया रुग्णालयाला अनुदान मिळाले पाहिजे यासाठी रुग्णांनी, मुंबईकरांनी आणि तसेच सर्व पक्षांनी मागणी केली होती. अनुदान नसल्यामुळे वाडिया रुग्णालयाची ट्रस्ट या रुग्णालयाची सेवा कमी कमी करत रुग्णालय बंद करण्याची भूमिका घेत होते. अनुदानाच्या नावावर पालिका अधिकारी, ट्रस्ट आणि विकासक मिळून काही डाव तर आखत नाही ना? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. अनुदान मिळत नाही म्हणून हे रुग्णालय बंद करायचं आणि नंतर ही जागा कोणत्यातरी बिल्डरला विकायची आणि गडगंज पैसा मिळवायचा, असा तर डाव नाही ना. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असे दरेकर म्हणाले.
हेही वाचा - 'निवासी भागात हॉटेल, पब 24 तास सुरू ठेवण्यास विरोध'
दरम्यान, राज्य शासनाने आणि महापालिकेने या रुग्णालयाला आता अनुदान दिलेले आहे. ते लवकरात लवकर अनुदान मिळवून हे रुग्णालय सुरळीत चालायला हवे. जर काही अडथळा येत असेल, तर याची चौकशी व्हायला हवी, असे देखील दरेकर म्हणाले.