मुंबई - सायन रुग्णालयातील घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे हे गंभीर आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तत्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी याबाबत ट्विट केले आहे.
-
Sion Hospital incident is extremely serious and shocking.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Patients which are being treated are lying beside dead bodies.
This is utterly inhuman.
Is there no one to care for Mumbai?
Govt must immediately look into this & ensure that it doesn’t happen ever again!#coronainmumbai
">Sion Hospital incident is extremely serious and shocking.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2020
Patients which are being treated are lying beside dead bodies.
This is utterly inhuman.
Is there no one to care for Mumbai?
Govt must immediately look into this & ensure that it doesn’t happen ever again!#coronainmumbaiSion Hospital incident is extremely serious and shocking.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2020
Patients which are being treated are lying beside dead bodies.
This is utterly inhuman.
Is there no one to care for Mumbai?
Govt must immediately look into this & ensure that it doesn’t happen ever again!#coronainmumbai
मुंबईच्या सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात माजी खासदार किरीट सोमैया यांनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे (ICMR) तक्रार केली. आमदार नितेश राणे यांनी बुधवारी हा व्हिडिओ ट्विट केला होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमधील धक्कादायक चित्र दिसून आले होते.
या वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्णांचे नातेवाईकही या वॉर्डमध्ये ये-जा करत आहेत, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हीच घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. शासनाने तत्काळ याकडे लक्ष द्यावे. हा प्रकार पुन्हा घडता कामा नये, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला ट्विटद्वारे म्हटले आहे.