मुंबई: वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यापालांचा या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. उपमुख्यमंत्री असताना राज्यपालांना भेटल्यानंतर मला जायचं, असे म्हणायचे. मी ही वरिष्ठांना सांगून जाण्याचा सल्ला द्यायचो. मात्र, वरिष्ठ परवानगी मिळत नसल्याने राज्यपालांकडून अशा वक्तव्याच्या शंकेला जागा निर्माण होते, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे. Ajit Pawar Criticized Bhagat Singh Koshyari
पवारांनी देखील राज्यपालांचा समाचार घेतला: राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वकव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्षांकडून याचा तीव्र शब्दात निषेध केला जातो आहे. Opposition leader Ajit Pawar On Criticism तसेच राज्यपालांना तात्काळ पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अजित पवारांनी देखील राज्यपालांचा समाचार घेतला. उपमुख्यमंत्री होतो तेव्हा राज्यपालांना भेटायला जात होतो. बऱ्याचदा राज्यपाल मला म्हणायचे, अजित जी अभी बस, अभी मुझे जाना है. त्यावर वरिष्ठांना सांगा आणि जा, असे सांगायचो. Ajit Pawar On Criticism Governor Bhagat Singh Koshyari मात्र, वरिष्ठ परवानगी देत नाहीत. त्यामुळे राज्यपालांकडून अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत का? असा प्रश्न निर्माण शंका घ्यायला जागा निर्माण होते, असे पवार म्हणाले.
राज्यपालाबाबत मौन, हे एक कोडे: ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या सोहळ्या निमित्त राज्यपाल कोश्यारींच्या विचारांमधील अंधार दूर होऊ दे, त्यांच्या वक्तव्यामधील गोंधळ संपू दे, महाराष्ट्राच्या राज्यपालांना सद्बुद्धी लागू दे, अशी प्रार्थना करतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्य सर्वांनाच चीड आणणारे होते. आजही मी या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार असे का बोलतात का वागतात? आणि सत्तारुढ मान्यवर यावर का गप्प बसतात, हे महाराष्ट्राला पडलेलं कोड असल्याचे सांगत पवार यांनी चौफेर टोलेबाजी केली.
सरकारमध्ये वाचाळवीर: राज्यात अलीकडच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे वेगवेगळे वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य सुरु आहेत. समाजात यामुळे तेढ निर्माण होत आहे. दोघांची भेट वाचाळवीरांना आवरा, तुम्ही काय सांगायचं आहे ते सांगा, यात बदल झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा नाही असं सांगितले. यशवंत चव्हाण यांच्या सरकारपासून ते वेगवेगळ्या सरकारमध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी होत नव्हती. तशा पद्धतीने महाराष्ट्राने ऐकले नाही खपून सुद्धा घेतले नाही. आता वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तींनापण यात तारतम्य राहिलेले नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
लोकप्रतिनिधींनी तारतम्य बाळगा: सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते खोटे बोलण्यात तरबेज आहेत. खोटे बोलूनच्या बोलून ते प्रवक्ते माझी काही चूक झालेली नाही, जो अर्थ काढला तोच चुकीचा काढला म्हणतात. सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी कहर केला, असा चिमटा गोपीचंद पडळकर यांनी काढला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किंवा कोणाविषयी आपण काय बोलतो. त्यावेळी बोलताना तारतम्य बाळगायला हवे, असा सल्ला दिला. केवळ सत्ताधारी पक्ष नव्हे, तर विरोधी पक्ष आणि विविध राजकीय पक्ष नेते, प्रवक्ते, कार्यकर्ते त्यांचे आमदारांनी तारतम्य ठेवत, कायदा, संविधान काय सांगतो याकडे लक्ष दिले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.