ETV Bharat / state

Ajit Pawar demand : किमान तीन आठवड्याचे अधिवेशन घ्या - अजित पवार यांची मागणी - तीन आठवड्याचे अधिवेशन

आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनात (demand in working advisory committee meeting) झाली. यावेळी किमान तीन आठवड्याचे अधिवेशन घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान, अधिवेशनकाळात नागपूर येथे सल्लागार समितीची पुढील बैठक होणार असून यावेळी निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात (Ajit Pawar demand three week session) आले.

Ajit Pawar demand
अजित पवार यांची मागणी
author img

By

Published : Dec 13, 2022, 1:46 PM IST

मुंबई : कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन (Winter session) होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Opposition leader Ajit Pawar) आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. यासंदर्भात पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिली.

समितीची बैठक : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधान भवनात झाली. बैठकील विधानसभा अध्यक्ष डॉ. राहूल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित (Ajit Pawar demand three week session) होते.

अमृतमहोत्सवी वर्ष : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरे व्हावे, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद केली आहे. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात यावे. मराठववाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा. विधीमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरु व्हावे, आदी मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत (Ajit Pawar demand) केल्या. दरम्यान, अधिवेशनकाळात नागपूर येथे सल्लागार समितीची पुढील बैठक होणार असून यावेळी निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी (demand in working advisory committee meeting) दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.