ETV Bharat / state

दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार - बहिष्कार

उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.

दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विरोधकांचा सरकाच्या चहापानावर बहिष्कार
author img

By

Published : Jun 16, 2019, 6:02 PM IST

मुंबई - राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह मंत्र्यांचे भ्रष्टाचार, मुंबईतील विकास आरखडा, विकास कामे यासारखे अनेक विषय या सरकारच्या काळात गंभीर बनले आहेत. त्याविरोधात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याविषयी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली.

दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विरोधकांचा सरकाच्या चहापानावर बहिष्कार

यावेळी मुंडे म्हणाले की, राज्यात सरकारने केवळ विकासाचा आभास निर्माण केला आहे. राज्यात दुष्काळात आम्ही फिरलो, मात्र सरकार, मंत्री कुठेच दिसले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी एसीमध्ये बसून आढावा घेतला, अनं शिवसेनेच्या प्रमुखांना विदेशवारी नंतर आता शेतकऱ्यांची आठवण आली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर केली.

राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर महसुली आणि राजकोषीय तूट निर्माण झाली आहे. राज्यावर हजारो कोटी रुपयांचे कर्ज वाढले आहे. त्यातही सरकारकडून आर्थ‍िक विकासाचा असाच आभास केला जात आहे. राज्यात शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न गंभीर बनले असून दुष्काळाची दाहकता सरकारला अजूनही कळली नाही. मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच सरकारने आज मंत्रिमंडळाचा विस्तार करून भ्रष्टाचार केलेल्या 6 मंत्र्यांना बाहेर केले असले तरी अजून दीड डझन भ्रष्टाचारी मंत्री हे सरकारमध्ये आहेत. त्याविषयी आम्ही या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे मुंडे म्हणाले.

मेहतांवर कारवाई करा-

एफएसआय घोटाळ्या प्रकरणी मेहता यांना केवळ मंत्री मंडळातून काढून काही होणार नाही, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे. तसेच राज्यात भीषण दुष्काळ असून सरकारने पेरणीसाठी 25 हजारची मदत द्यावी, तसेच तातडीने सरसकट कर्जमाफी आणि वीज बिल माफ करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

विरोधीपक्षाच्या या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे गटनेते विजय वडट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानमंडळ नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पीआरपीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे गणपराव देशमुख आदी नेते उपस्थित होते.

Intro:दुष्काळ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विरोधकांनी टाकला चहापानावर बहिष्कार

(यासाठी मोजोवरून फिड पाठवलेले आहे ते घ्यावेत)
मुंबई, ता. १६ :
राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न योसाबत मंत्र्यांचे भ्रष्टाचार, मुंबईतील विकास आरखडा, विकास कामे आदी अनेक विषय या सरकारच्या काळात गंभीर बनले असल्याने त्याविरोधात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी पक्षाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यासंदर्भात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याविषयी भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली.
धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यात सरकारने केवळ विकासाचा आभास निर्माण केला आहे.राज्यात दुष्काळात आम्ही फिरलो, मात्र सरकार, मंत्री कुठेच दिसले नाहीत, मुख्यमंत्री यांनी एसी मध्ये बसून आढावा घेतला, अन शिवसेनेच्या प्रमुखांना विदेशवारी नंतर आता शेतकऱ्यांची आठवण आली आहे.
राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर महसुली आणि राजकोषिय तूट निर्माण झाली असून राज्यावर हजारो कोटी रूपयांचे कर्ज वाढले आहे. त्यातही सरकारकडून आर्थ‍िक विकासाचा असाच आभास केला आहे. राज्यात शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न गंभीर बनले असून दुष्काळाची दाहकता सरकारला अजूनही कळली नाही. मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रश्न निर्माण झाले असून त्यातच यात सरकारने आज मंत्र‍िमंडळाचा विस्तार करून भ्रष्टाचार केलेल्या सहा मंत्र्यांना बाहेर केले असले तरी अजून दीड डझन भ्रष्टाचारी मंत्री हे सरकारमध्ये असल्याने त्याविषयी आम्ही या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे मुंडे म्हणाले.
बाराशे कोटी एफएसआय घोटाळ्या प्रकरणी मेहता यांना केवळ मंत्री मंडळातून काढून काही होणार नाही तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही मुंडे यांनी केली तसेच राज्यात भीषण दुष्काळ असून सरकारने पेरणीसाठी 25 हजार रु मदत द्यावी आणि तातडीने, सरसकट कर्जमाफी अशणि वीज बिल माफ करावी अशी मागणीही त्यांनी केली.
विरोधीपक्षाच्या या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे गटनेते विजय वडट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानमंडळ नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पीआरपीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे गणपराव देशमुख आदी नेते उपस्थित होतेBody:दुष्काळ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विरोधकांनी टाकला चहापानावर बहिष्कार Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.