मुंबई Pollution Contro : मुंबईतील दूषित होत चाललेल्या हवेच्या प्रदूषणासाठी अनेक कारणे आहेत. मुंबईत बिघडत चाललेले वातावरण, त्याचबरोबर विविध प्रकारचे प्रदूषण व त्याने उद्भवणारे आजार या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जात आहे. तसेच प्रदूषणाचा स्तर हा दिवसेंदिवस वाढत चालल्यानं, अखेर सरकारनं याबाबत गंभीर दखल घेत अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे त्याने होणारे प्रदूषण. त्याचबरोबर दिवाळीत (Diwali 2023) फटाके वाजवण्यासाठी सुद्धा आता उच्च न्यायालयाने दोनच तासाची परवानगी दिली आहे. एकीकडे सरकार तसेच महानगरपालिकेकडून अनेक निर्बंध लावले जात असताना, वाढत्या प्रदूषणाबाबत मुंबई महानगरपालिका खरोखर गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रदूषणाबाबत किती गंभीर आहे? : मुंबईतील वाढते प्रदूषण हा आजकालचा विषय नाही. तो अनेक वर्षापासून मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढत होत चालली आहे. यासाठी एप्रिल महिन्यामध्ये मुंबईत पाच ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्र बसवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाला आठ महिने होत आले तरीसुद्धा धूळ नियंत्रित यंत्रणा अद्याप कागदावरच आहे. आठ महिन्यापूर्वीच कंत्राटदाराला याबाबत कार्यादेश दिल्यानंतर सुद्धा अद्याप यंत्रणा बसवण्यात आली नसल्यानं, मुंबई महानगरपालिका प्रदूषणाबाबत किती गंभीर आहे? हे या माध्यमातून समोर आलं आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील देखभाल विभाग व पर्यावरण विभाग यांच्यामध्येच समन्वय नसल्यानं ही यंत्रणा बसवण्यात विलंब होत असल्याचं समोर आलं आहे.
आरोग्याशी अक्षरशः खेळ : याबाबत बोलताना मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितलं आहे की, मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांच्या जनतेच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ करत आहे. मुंबईतील हवा दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. मुंबईकरांचा श्वास कोंडला जात आहे. पण मुंबई महानगरपालिकेमध्ये बसलेले प्रशासक त्याचप्रमाणे सरकारला याबद्दल काही पडलेलं नाही. मुंबईत वाढत जाणारी बांधकाम व त्याला दिली जाणारी परवानगी यामुळं मुंबई बकाल होत चालली आहे. हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण या सरकारचं व नेत्यांचं बिल्डरांशी असलेले आर्थिक संबंध यामुळं यावर काहीच कारवाई होणार नाही. आम्हाला आता फक्त न्यायालयावर विश्वास आहे.
कुठे बसवणार यंत्र : मुंबईतील बीकेसी कलानगर जंक्शन, एलबीएस जंक्शन छेडा नगर, हाजी अली आणि दहिसर चेक नका या पाच ठिकाणी ही यंत्रणा बसवणार बसवली जाणार होती. परंतु हाजीअली येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं, यापूर्वीच यंत्रणा बसवण्यात आली आहेत. ती जागा बदलून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील ट्रॉमा केअर रुग्णालय येथील चौकामध्ये ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीसुद्धा जागा निश्चित होऊनही या यंत्रणा बसवण्यात न आल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हेही वाचा -