ETV Bharat / state

शरद पवार अन् अमित शाह यांच्या कथित भेटीचे रहस्य काय..?

शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री शरद पवार यांच्यात अहमदाबाद येथे भेट झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीकडून ही भेट झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजपकडून भेट झाल्याचे संकेत देण्यात येत आहे. मात्र, याचे राजकीय पडसाद केवळ महाराष्ट्रच नाही तर पश्चिम बंगालमध्येही उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहेत.

pawar shah
पवार शाह
author img

By

Published : Mar 30, 2021, 7:21 PM IST

Updated : Mar 30, 2021, 8:00 PM IST

मुंबई - शरद पवार व अमित शाह यांच्यात अहमदाबाद येथे भेट झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या भेटीचे खंडन करण्यात आले असले तरी, भाजपकडून ही भेट झाली असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. या भेटीनंतर राजकीय समीकरणे बदलतील, असा इशारा भाजप नेत्यांकडून द्यायला सुरुवात झाली आहे. मात्र, या कथित भेटीच्या चर्चेमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगालमध्येही राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.

बोलताना राजकीय विश्लेषक पुरो

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीच्या चर्चेमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र, ही भेट झाली किंवा नाही याबद्दल अजूनही दोन्ही पक्षाकडून मतमतांतरे पाहायला मिळतात. या कथित भेटीचे अनेक राजकीय कंगोरे काढले जात आहेत. खास करून या कथित भेटीच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ आहे. भारतीय जनता पक्षाकडून शरद पवार व अमित शाह यांची भेट झाल्याचे थेट कोणीही नाकारत नाही. तिथेच या भेटीमुळे येत्या काळात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळतील, असे संकेत देखील काही भाजप नेत्यांकडून देण्यात आली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर, थेट दिल्लीचे पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतील, त्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल, असे म्हटले आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे यांनी "आगे-आगे देखो होता है क्या", असे म्हणत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युती येणाऱ्या काळात पाहायला मिळेल असेच जणू संकेत त्यांनी दिले.

शरद पवार व अमित शाह यांची भेट झालीच नाही.?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोणतीच भेट गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाली नाही. केवळ अमित शाह व शरद पवार यांची कथीत भेट झाली असल्याचे चित्र तयार करून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल राज्यात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शरद पवार व प्रफुल्ल पटेल हे उद्योगपती अडाणी यांच्या घरी असलेला लग्नसोहळ्याला जाणार होते. मात्र, रविवारी (28 मार्च) असलेल्या या लग्नसोहळ्यात शरद पवारांना जाता येणार नसल्याने ते एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी (27 मार्च) अहमदाबादमध्ये गेले होते. मात्र, तेव्हाही शरद पवार व अमित शाह यांची भेट झाली नाही. कारण, अमित शाह हे 27 मार्चला गुजरातमध्ये नव्हते, तर शरद पवार हे 27 मार्चच्या सायंकाळी अहमदाबादमधून निघाले होते. त्यामुळे ही भेट झाली का? यावर शंका उपस्थित केली जाते असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी मांडले आहे.

कथित भेटीच्या चर्चेमूळे शिवसेना, काँग्रेस नेते संभ्रमात

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार व अमित शाह यांची भेट झालीच नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या भेटीच्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये फूट पाडण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जातात, असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भेटीचा चर्चेनंतर शिवसेना काही गोंधळात असलेली पाहायला मिळाली. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होताच शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाली असेल तर, त्यात नवल नाही. हे दोन्ही नेते देशातील मोठे नेते असून वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या भेटी होत असतील तर त्यामध्ये गैर काय, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आधी केला. मात्र, काहीवेळा नंतरच अमित शाह व शरद पवार यांची गुजरातमध्ये भेट झालीच नाही, अशा प्रकारचे ट्विट करून या भेटीच्या वृत्ताचा खंडन त्यांनी केले. तर तिथेच महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी देखील या भेटीचे वृत्त खोटे असून अशा प्रकारची कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

कथित भेटीच्या चर्चेचे पडसाद पश्चिम बंगालमध्ये

पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पहिल्या चरणात मतदान झाले असून अजून सात चरणाचे मतदान बाकी आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार हे एक एप्रिलला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. एक एप्रिल ते तीन एप्रिल असे तीन दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून ममता बॅनर्जी यांसह तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांसाठी ते सभा तसेच रोड शो करणार होते. मात्र, प्रकृती बिघडल्यामुळे सध्या हा दौरा जवळजवळ रद्दच असल्याचे राष्ट्रवादीतील सुत्रांकडून सांगण्यात येते आहे. शरद पवार सारखे नेते पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी गेले तर, याचा कुठे ना कुठे फटका भाजपला नक्कीच बसला असता. पण, खुद्द शरद पवार जर अमित शाह यांची भेट घेतात अशा प्रकारचे चित्र जर भाजपाकडून तयार करण्यात आले तर याचा नक्कीच फायदा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला होऊ शकतो हे देखील भाजपला माहित आहे. त्यामुळे अमित शाह आणि शरद पवार यांची गुजरातमध्ये भेट झाली आहे असं चित्र भाजपकडून रंगवण्यात येत असल्याचे पुरो यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; अचानक जाणवू लागला त्रास

Last Updated : Mar 30, 2021, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.