ETV Bharat / state

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील आरक्षण सरसकट संपवा; डॉक्टरांसह काही विद्यार्थ्यांची मागणी - Reservation

द्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी खुल्या गटाला फक्त ५ टक्के जागा राहत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे मुश्किल होऊन बसले आहे.

प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Mar 15, 2019, 12:15 PM IST

मुंबई - राज्य सरकारने दिलेले १६ टक्के मराठा आरक्षण व केंद्र सरकारने सवर्णांना जाहीर केलेले १० टक्के आरक्षण यामुळे देशातील आरक्षणाचा कोटा वाढला आहे. यातच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी खुल्या गटाला फक्त ५ टक्के जागा राहत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे मुश्किल होऊन बसले आहे. त्यामळे गुरूवारी खुल्या गटातील काही विद्यार्थी व पालकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणार्‍या खुल्या गटातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मराठा आरक्षणासह सरसकट आरक्षण पद्धतच बंद करण्यात यावी, असा पवित्रा घेतला.

विद्यार्थी आणि डॉक्टर

मराठा समाज व सवर्णांना दिलेल्या आरक्षणामुळे यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षणामध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के, मागासवर्गीय आरक्षण २५ टक्के, मराठा आरक्षण ८ टक्के, सवर्ण आरक्षण ५ टक्के व विविध सरकारी नोकरीतील कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी ७ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी फक्त ५ टक्केच जागा शिल्लक राहत आहेत. त्या तुलनेत खुल्या गटामध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

महाराष्ट्रामध्ये इंजिनियरिंग क्षेत्रानंतर सर्वाधिक प्रवेश हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये घेतले जातात. त्यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांना मिळणार्‍या ५ टक्के जागांमुळे त्यांना वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व पालकांनी गुरुवारी आपल्या भावनांना वाट करून दिली. आम्ही नियमितपणे कर भरूनही आमच्या मुलांना शिक्षण मिळणार नसेल तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात आला. काही पालकांनी संपूर्ण आरक्षणच रद्द करण्यात यावे अशी मागणी केली. मुंबई मराठी पत्रकार संघात काही डॉक्टर आणि त्यांचे पाल्य यावेळी विरोध करण्यासाठी उपस्थित होते.

Intro:प्रतिनिधी : मुंबई

राज्य सरकारने दिलेले 16 टक्के मराठा आरक्षण व केंद्र सरकारने सवर्णांना जाहीर केलेले 10 टक्के आरक्षण यामुळे आरक्षणाचा कोटा वाढत चालला आहे. यापार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अकरावीला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी इन हाऊस कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला. परंतु वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश घेणार्‍या खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्गच बंद झाल्याने गुरूवारी खुल्या गटातील काही विद्यार्थी व पालकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणार्‍या खुल्या गटातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मराठा आरक्षणासह सरसकट आरक्षण पद्धतच बंद करण्यात यावी, असा अजब पवित्रा घेतला.Body:मराठासमाज व सवर्णांना दिलेल्या आरक्षणामुळे यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रवेशप्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षणामध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के, मागासवर्गीय आरक्षण 25 टक्के, मराठा आरक्षण 8 टक्के, सवर्ण आरक्षण 5 टक्के व विविध सरकारी नोकरीतील कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी 7 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी फक्त पाच टक्केच जागा शिल्लक राहत आहेत. त्या तुलनेत खुल्या गटामध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रामध्ये इंजिनियरिंग क्षेत्रानंतर सर्वाधिक प्रवेश हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये घेतले जातात. त्यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांना मिळणार्‍या पाच टक्के जागांमुळे त्यांना वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व पालकांनी गुरुवारी आपल्या भावनांना वाट करून दिली. आम्ही नियमितपणे कर भरूनही आमच्या मुलांना शिक्षण मिळणार नसेल तर त्याचा उपयोग काय असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात आला. काही पालकांनी संपूर्ण आरक्षणच रद्द करण्यात यावे अशी अजब मागणी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात काही डॉक्टर आणि त्यांचे पाल्य यावेळी विरोध करण्यासाठीउपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.