ETV Bharat / state

कोरोना काळात 'ऑनलाइन मेडिकल कन्सल्टन्सी' ठरतेय संजीवनी - corona pandemic

कोरोनाची एकंदर परिस्थिती लक्षात घेता आयएमएने लॉकडाऊनच्या आधीच इंडियन मेडिकल कौन्सिलकडे 'ऑनलाइन मेडिकल कन्सल्टन्सी'ची परवानगी मागितली. २६ मार्चला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईतील आयएमएच्या कित्येक डॉक्टरांनी या पद्धतीचा अवलंब करत रुग्णांना दिलासा देण्यास सुरुवात केली. आता याला डॉक्टर आणि रुग्ण दोघांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ऑनलाइन मेडिकल कन्सल्टन्सीचा ट्रेण्डही वाढत असल्याची माहिती आयएमए, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

Online medical consultancy
ऑनलाइन मेडिकल कन्सल्टन्सी
author img

By

Published : Jun 29, 2020, 5:02 PM IST

मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊननंतर मुंबईतील अनेक खासगी रुग्णालयाचे शटर डाऊन झाले असून क्लिनिकही बंद आहेत. सर्व सरकारी आणि पालिका रुग्णालयांचे रूपांतर कोविड रुग्णालयात झाले आहे. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. अशातच 'ऑनलाइन मेडिकल कन्सल्टन्सी' अनेक रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. डॉक्टरांकडे न जाता ऑनलाइन संपर्क साधत अनेक डॉक्टर ई-प्रिस्क्रिप्शनद्वारे रुग्णांवर उपचार करत आहेत. तर यामुळे नॉन कोविड रुग्ण संसर्गापासून दूर राहत असल्याने आता ऑनलाइन मेडिकल कन्सल्टंन्सीला प्रतिसाद वाढत असून कॊरोनानंतरही भारतात हा ट्रेंड राहील आणि वाढेल, असा दावा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने केला आहे.

कोरोनाची एकंदर परिस्थिती लक्षात घेता आयएमएने लॉकडाऊनच्या आधीच इंडियन मेडिकल कौन्सिलकडे 'ऑनलाइन मेडिकल कन्सल्टन्सी'ची परवानगी मागितली. २६ मार्चला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईतील आयएमएच्या कित्येक डॉक्टरांनी या पद्धतीचा अवलंब करत रुग्णांना दिलासा देण्यास सुरुवात केली. आता याला डॉक्टर आणि रुग्ण दोघांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ऑनलाइन मेडिकल कन्सल्टन्सीचा ट्रेण्डही वाढत असल्याची माहिती आयएमए, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

सरकार आणि पालिकेची जवळपास सगळीच आरोग्य यंत्रणा कॊरोनाच्या कामात आहे. अशावेळी नॉन कोव्हिड रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तर ताप, सर्दी-खोकला म्हटल्यास कुणी डॉक्टर हात लावायलाही तयार होत नाहीत. अशावेळी कोविड रुग्णांनाही ऑनलाइन पध्दती फायद्याची ठरत आहे. त्यामुळेच नव्या नियमानुसार लक्षणे नसलेल्या कॊरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आता घरीच ठेवत पालिकेचे डॉक्टरही ऑनलाइन पद्धतीनेच लक्ष ठेवत आहेत. तर काही खासगी रुग्णालयांनी या संधीचा फायदा घेत होम क्वारंटाइन पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ऑनलाइन ट्रीटमेंटचे पॅकेज सुरू केले आहे. यालाही रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

माहिती देताना आयएमए, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे
ऑनलाइन पध्दतीमुळे कॊरोनाचा संसर्ग टाळता येत आहे. पण त्याचवेळी या पद्धतीचा वापर करताना डॉक्टरांची जबाबदारीही वाढल्याचे डॉ. भोंडवे यांनी सांगितले आहे. कारण कितीही झाले तरी रुग्णांना तपासल्याशिवाय त्यांच्यावर उपचार करताच येत नाहीत. त्यामुळे रुग्णाकडून व्यवस्थित माहिती घेण्याची जबाबदारी वाढते. तेव्हा ही काळजी घेत शक्य त्या रुग्णांना टेलिफोनिक वा ऑनलाइन पध्दतीने उपचार करणे आता कॊरोनाच्या काळात अत्यावश्यक झाले आहे. तर कॊरोना किती वेळ राहणार हे माहीत नसल्याने हा ट्रेंड आता भारतात रूढ झाला तर अस नवल वाटायला नको असेही डॉक्टर सांगत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.