मुंबई- केंद्र सरकारकडून आजपासून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. ही कांदा खरेदी नाशिक व अहमदनगर येथील केंद्रातून नाफेड करणार आहे. कांद्याला प्रति क्विंटल 2410 रुपये हा मिळालेला दर ऐतिहासिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलत होते.
कृषिमंत्री धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असताना जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. केंद्र सरकारने राज्यातून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आपल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक व अहमदनगर येथून कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. प्रति क्विंटल 2410 दराने कांदा खरेदी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले.
-
Maharashtra's Agriculture Minister Dhananjay Munde met Union Minister Piyush Goyal today and handed over a memorandum to him regarding onion growers of the state. https://t.co/MP9IcEEQS6 pic.twitter.com/gT6j4c7ynE
— ANI (@ANI) August 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra's Agriculture Minister Dhananjay Munde met Union Minister Piyush Goyal today and handed over a memorandum to him regarding onion growers of the state. https://t.co/MP9IcEEQS6 pic.twitter.com/gT6j4c7ynE
— ANI (@ANI) August 22, 2023Maharashtra's Agriculture Minister Dhananjay Munde met Union Minister Piyush Goyal today and handed over a memorandum to him regarding onion growers of the state. https://t.co/MP9IcEEQS6 pic.twitter.com/gT6j4c7ynE
— ANI (@ANI) August 22, 2023
शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही- कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबतचे निवेदन गोयल यांना दिले.त्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारच्या आदेशानुसार, नाफेड आणि एनसीसीएफने नाशिक, लासलगाव, अहमदनगर इत्यादी ठिकाणावरून 3 लाख टन कांदा खरेदी केला आहे. देशात पुरेशा प्रमाणात कांदा उपलब्ध व्हावा म्हणून कांद्यावर निर्यात कर लागू करण्यात आला. कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही.
दरम्यान, देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव सलग दुसऱ्या दिवशीही बंद आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातही जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव अनिश्चित काळासाठी बंद आहेत. कांदा निर्यात शुल्काविरोधात शेतकरी संघटनांनी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन केले आहे.
हेही वाचा-