ETV Bharat / state

ONGC Engineer Missing : ओएनजीसीच्या इलेक्ट्रिकल इंजिनीयरने घेतली भर समुद्रात उडी.. अन् झाला बेपत्ता, आता शोध सुरु - ONGC Electrical Engineer Missing

बॉम्बे हाय येथील ओएनजीसीच्या ऑफशोअर इन्स्टॉलेशनमध्ये कंत्राटावर काम करणाऱ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या एनोस वर्गीस (२६) याने समुद्रात उडी मारल्यानंतर तो बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी यलो गेट पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

ONGC Engineer Missing
ओएनजीसीचा इलेक्ट्रिकल इंजिनीयर बेपत्ता
author img

By

Published : Mar 1, 2023, 9:40 AM IST

मुंबई : पोलिसांनी समुद्र किनाऱ्यालगतच्या सर्व पोलीस ठाण्यांना पत्र लिहून सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाण्यात वाहून जात असताना समुद्रकिनारी कोणी आढळल्यास त्याची माहिती यलो गेट पोलिसांना द्यावी अशी विनंती केली आहे. एनोस वर्गीस हे गेल्या एक वर्षापासून गुजरातमधील एका कंपनीत काम करत होते. त्यांना तीन आठवड्यांपूर्वी ओएनजीसी ऑफशोअर ऑइल प्लॅटफॉर्म, बॉम्बे हाय, मुंबई किनारपट्टीपासून 160 किमी अंतरावर तैनात करण्यात आले होते. ते सध्या बेपत्ता आहेत.

योग्य चौकशीची मागणी : यलो गेट पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिकल इंजिनिअर एनोस वर्गीस (२६) बेपत्ता झाल्याची चौकशी करण्यासाठी बॉम्बे हाय येथील ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन (ओएनजीसी) च्या ऑफशोअर इन्स्टॉलेशनवर यलो गेट पोलिसांचे पथक गेले होते. यलो गेट पोलिसांनी या प्रकरणी ऑफशोअरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे. एनोसचे वडील रेजी यांनी सांगितले की, या प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे जेणेकरून सत्य बाहेर येईल. यलो गेट पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वर्गीस यांनी शुक्रवारी समुद्रात उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस तात्काळ ओएनजीसी ऑफशोअर प्लॅटफॉर्मवर पोहोचले. वर्गीसचा शोध घेण्यासाठी ओएनजीसीने नौदल आणि तटरक्षक दलाची मदत घेतली. वर्गीस यांचा हेलिकॉप्टरमधून शोध घेण्यात आला. मात्र त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.

उडी मारू शकत नाही : एनोसच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, दुपारीच त्याचे आईशी बोलणे झाले होते, त्यानंतर सर्व काही ठीक वाटले, पण अचानक काय झाले की एनोसने समुद्रात उडी घेतली. माझा मुलगा उडी मारू शकत नाही. एनोसच्या मित्रांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 7 च्या दरम्यान त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये त्याने सांगितले होते. त्याच्या जीवाला धोका आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी संबंधित सर्वांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, एनोस वर्गीस याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांचे जबाब घेण्यात आले आहेत. याप्रकरणी समुद्रात ओएनजीसीच्या प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी उपस्थित कर्मचाऱ्यांचे जबाबही घेण्यात येत आहेत. आता सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून त्याचा तपास करता येईल.

एनोस वर्गीसचा शोध : यलो गेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी एनोस वर्गीस बेपत्ता असल्याची तक्रार ओएनजीसीकडून प्राप्त झाली आहे. पोलिसांचे पथक वर्गीसचा शोध घेत आहे. वर्गीस यांच्या मृत्यूला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र, या घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी मंगळवारी पथकाने ओएनजीसीच्या समुद्रातील प्लॅटफॉर्मवर जाऊन कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले.

हेही वाचा : Covid Centre Scam : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी चहावाल्यासह दोघांना अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.