ETV Bharat / state

दादर परिसरात ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ४ जणांना अटक

इंग्लंड येथे सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्यावर पोलिसांनी धाड टाकली होती. यात एका पोलीस उपनिरीक्षकासह चार जणांना पोलिसांनी अटक केली. न्यायलयाने त्यांची जामिनावर सुटका केली असून पोलीस उपनिरीक्षकास निलंबित करून त्याची चौकशी सुरू आहे.

हाच तो पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खारमाटे
author img

By

Published : Jun 27, 2019, 1:17 PM IST

मुंबई - येथील माटुंगा पोलिसांनी क्रिकेट विश्वचषक सामन्यादरम्यान सट्टा चालविणाऱ्या ३ आरोपींसह मुंबई पोलिसांच्या भायखळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकास अटक केली आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट मालिकेतील २५ जून रोजी इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना सूरू होता. यावेळी मुंबईतील दादर पूर्व परिसरातील रामी गेस्ट लाईन या हॉटेलच्या रूम क्र. ७०६ मध्ये ऑनलाईन सट्टा घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी धाड मारली असता मिकीन चंद्रश शहा (वय ३३ वर्षे), मनीष विजय सिंग (वय ३१ वर्षे), आणि प्रकाश घनश्याम बनकर (वय ३१ वर्षे) हे तीन आरोपी एका संकेतस्थळावरून पंटर व इतर बुकिंकडून सट्टा चालवत होते. या कारवाई दरम्यान भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खारमाटे (वय ३४ वर्षे) हा अधिकारीही मिळून आला. या संदर्भात पोलिसांकडून मुंबई जुगार प्रतिबंध कायदा सहकलम 25(क), भारतीय टेलिग्राफ कायद्यान्वये गुन्हा नोंदवून चारही आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. दरम्यान पोलीस कारवाईत बुकिंसोबत आढळून आलेल्या पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खारमाटे या अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात या अधिकाऱ्याच्या सहभागाबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Intro:मुंबईतील माटुंगा पोलिसांनी क्रिकेट वर्ल्ड कप च्या दरम्यान बेटिंग चालविणाऱ्या 3 आरोपींसह मुंबई पोलिसांच्या भायखळा पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षकास अटक केली आहे. सध्या इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान 25 जून रोजी सामना खेळविला जात असताना मुंबईतील दादर पूर्व परिसरातील रामी गेस्ट लाईन या हॉटेलच्या रूम क्रमांक 706 मध्ये ऑनलाइन बेटिंग घेतली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
Body:या दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी धाड मारली असता मिकीन चंद्रश शहा (33) व मनीष विजय सिंग (31), प्रकाश घनश्याम बनकर (31) हे तीन आरोपी www.lotusbook247.com या संकेतस्थळावरून पंटर व इतर बुकिंकडून बेटिंग चालवत होते. या कारवाई दरम्यान भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खारमाटे (34) हा अधिकारीही मिळून आला. या संदर्भात पोलिसांक मुंबई जुगार प्रतिबंध कायदा सहकलाम 25(क), भारतीय टेलिग्राफ कायद्यान्वये गुन्हा नोंदवून 4 आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. Conclusion:दरम्यान पोलीस कारवाईत बुकिंसोबत आढळून आलेल्या पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खारमाटे या अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात या अधिकाऱ्याच्या सहभागाबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.