ETV Bharat / state

टीआरपी प्रकरण : घोटाळ्यातील मुख्य आरोपीला अटक - trp scam accused

टीआरपी प्रकरणांत पोलिसांनी शुक्रवारी विमा, वित्तीय, आरोग्यसेवा आणि ई-लर्निंग उद्योगांना ऑन-डिमांड सॉफ्टवेयर आणि ई-कॉमर्स सेवा देणारे आंतरराष्ट्रीय कंपनी एबिक्स इंकच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले.

trp scam
टीआरपी प्रकरण
author img

By

Published : Oct 21, 2020, 1:46 AM IST

मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणांतील मुख्य आरोपी दिनेश विश्वकर्मा (वय-37) याला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. तो वाराणसीहून मुंबईला आला होता. दिनेश हा हंसाचा कर्मचारी होता. तो मुंबईत संघर्ष नगर, चांदिवली येथे राहत होता.

प्रकरणांत एका वृत्तवाहिनीची भागीदार कंपनी इबीक्स कॅश टेक्नोलाॅजीचे एमडी मिलन गणात्रा यांचा जबाब नोंदवण्यात आला. या वृत्त वाहिनीला स्पाॅन्सर केल्याबद्दल त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. तसेच CIUने आणखी कागदपत्रे मागितली आहेत. प्रविण निजारा हंसाचे सीईओ तसेच हंसाच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांचा तपशील मागवण्यात आला आहे.

  • TRP प्रकरणात सातवी अटक

रामजी वर्मा (वय-41, रा. राठी, उत्तर प्रदेश) याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. 2013 ते 2014 काळात तो हंसाचा कर्मचारी होता. हंसामध्ये तो रिलेशनशिप मॅनेजर म्हणुन काम करत होता. तसेच तो मुंबईतील वरळी भागात राहायला होता. उमेश मिश्राला त्या वृत्तवाहिसंदर्भातील काॅन्टॅक्ट रामजीने दिले होते.

दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी विमा, वित्तीय, आरोग्यसेवा आणि ई-लर्निंग उद्योगांना ऑन-डिमांड सॉफ्टवेयर आणि ई-कॉमर्स सेवा देणारे आंतरराष्ट्रीय कंपनी एबिक्स इंकच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले.

एका वृत्तवाहिनीने गेल्या वर्षी एबिक्स कॅश स्टुडिओच्या स्थापनेसह ब्रँड आणि बातम्यांचे संचलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, एबिक्स कॅश स्टुडिओमधून बातम्या आणि संबंधित कार्यक्रम संचालित केले जातात.

  • काय आहे प्रकरण ?

पोलिसांकडून चलचित्र वाहिन्यांच्या (टीव्ही चॅनल्स) टीआरपी घोटाळ्याचा एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. आपल्या चॅनेलचा टीआरपी जास्त यावा यासाठी काही चॅनल्स संबंधितांना पैसे देऊन दिवसभर टीव्ही सुरू ठेवत ते चॅनल लावण्यास सांगत होते. हे रॅकेट देशासह विदेशातही अस्तित्वात असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी एका आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती.

टीआरपीचे मोजमाप करणाऱ्या बीएआरसी (ब्रॉडकास्ट ऑडीयन्स रिसर्च कौन्सिल) म्हणजेच प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषद या संस्थेच्या एका हंसा नावाच्या एजन्सीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. देशभरात सुरू असलेल्या वृत्तवाहिन्या व मनोरंजन वाहिन्यांचे मापदंडाचे काम बीएआरसीकडून करण्यात येते.

चलचित्र वाहिन्यांचे टीआरपी ठरवण्यासाठी देशभरात 30 हजारांहून अधिक मापदंड तर मुंबईसारख्या शहरात 2 हजारांहून अधिक मापदंड करायची जबाबदारी बीएआरसीवर आहे. मात्र, याचे कंत्राट हंसा नावाच्या एजन्सीला देण्यात आले होते. टीआरपी छेडछाडीचे रॅकेट परदेशातही अस्तित्वात असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईतील काही अशिक्षित लोकांच्या घरी इंग्रजी न्यूज चॅनल लावून ठेवण्याची अट हंसा एजन्सीकडून घालण्यात येत होती. यासाठी संबंधितांना महिन्याला ठराविक पैसेही दिले जात होते. या टीआरपी घोटाळ्यात दोन मराठी चॅनेल व एक भारतीय इंग्रजी न्यूज चॅनलचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी दोन्ही मराठी चॅनलच्या मालकांना मुंबईतून अटक केली आहे. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात संबंधित चॅनलच्या मालकापासून कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.