मुंबई - डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटना ताजी असतानाच याच विभागातील एका इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
डोंगरी चिंच बंदर, साई धाम मॉल येथील एका इमारतीचे निर्मानाधीन काम सुरू होते. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास या इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळला. त्याखाली २ जण अडकले होते. या दोघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून, त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही. तर शब्बीर शेख (वय 22) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.