ETV Bharat / state

मुंबईत मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे 150 झाडे कोसळली; पालिकेकडून झाडांची काळजी घेतली जात नसल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप - मुंबई लेटेस्ट न्यूज

बुधवारी मुंबईत झाडे उन्मळून पडण्याच्या एकूण 150 घटना घडल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. दरम्यान, 150 पैकी 140 झाडे घटनास्थळावरून आतापर्यंत हटवण्यात आली असून 10 झाडे हटवण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील झाडे मोठ्या संख्येने कमकुवत होत चालली असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

One hundred fifty trees collapsed in Mumbai
मुंबईत 150 झाडे कोसळली
author img

By

Published : Aug 6, 2020, 1:10 PM IST

मुंबई- गेले दोन दिवस मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले आहे. मुंबईची तुंबई झाली असताना दुसरीकडे या पावसाचा मोठा फटका झाडांना बसला आहे. बुधवारी दिवसभरात मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे 150 झाडे उन्मळून पडल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. पर्यावरणप्रेमींनी मात्र पालिका झाडांची योग्य ती काळजी घेत नसल्याने झाडे कमकुवत होत चालली असून अशीच झाडे पावसात पडत असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या 46 वर्षातील विक्रमी पाऊस बुधवारी मुंबईत झाल्याचे सांगितले जात आहे. 1974 मध्ये एका दिवसात 264 मिमी पाऊस पडला होता. तिथे बुधवारी एका दिवसात 296 मिमी पाऊस पडला. या पावसाचा मोठा फटका मुंबई शहर आणि उपनगरातील झाडांना बसला आहे. बुधवारी मुंबईत झाडे उन्मळून पडण्याच्या एकूण 150 घटना घडल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. दरम्यान, 150 पैकी 140 झाडे घटनास्थळावरून आतापर्यंत हटवण्यात आली असून 10 झाडे हटवण्याचे काम सुरू आहे. बुधवारी पाऊस खूपच जास्त होता आणि ताशी 100 किमी वेगाने वारे वाहत होते. परिमाणी झाडे मोठ्या संख्येने पडल्याचेही सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

नैसर्गिकरित्या झाडे कोसळतात तेव्हा कुणालाही खऱ्या अर्थाने दोष देता येत नाही. जी झाडे पावसात पडतात ती कमकुवत झालेली असतात. मुंबईतील झाडे मोठ्या संख्येने कमकुवत होत चालली असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी केला आहे. झाडांची वेळच्या वेळी योग्य प्रकारे छाटणी अर्थात ट्रीमिंग होत नसल्याने तसेच इतर कारणामुळे झाडे कमकुवत होऊन ती पावसात कोसळत असल्याचेही झोरू बाथेना यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नैसर्गिकरित्या झाडे कोसळल्यानंतर त्या बदल्यात पालिकेला दुप्पट झाडे लावावी लागतात. त्यानुसार आता 300 झाडे पालिकेला लावणे बंधनकारक आहे. मात्र, नैसर्गिकरित्या झाडे कोसळल्यानंतर पालिका झाडे लावते का, आत्तापर्यंत अशी किती झाडे लावली, कुठे लावली हा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.