मुंबई Mumbai Crime News : चुनाभट्टी परिसरातील आदर्श नगर येथे रविवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास आपापसातल्या वादातून गोळीबार झाल्याची खळबळजळ घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात गोळीबार करणाऱ्यांविरोधात चुनाभट्टी पोलीस ठाण्यात (Chunabhatti Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराज रजपूत (Hemraj Rajput) यांनी दिलीय.
आरोपीचा शोध सुरू : या गोळीबारात सुमित येऊणकर याचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार (Sion Hospital Mumbai ) सुरु आहेत. तर जखमींची प्रकृती स्थिर आहे. आरोपीची ओळख पटली आहे. पोलिसांच्या नऊ टीम तयार करण्यात आल्या असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोळीबारात एकाचा मृत्यू : चुनाभट्टी परिसरातील आदर्श नगर येथे रविवारी दुपारी सुमित येरुणकर आणि तिघांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेला सुमित येरुणकर याचा मृत्यू झाला. तर जखमी तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिलीय. गोळीबार करणारी व्यक्ती आणि सुमित येरुणकर यांच्यात पूर्ववैमनस्य असल्याची माहिती मिळत आहे. या पूर्ववैमनस्यातूनच हा गोळीबार झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
सायन रुग्णालयात उपचार सुरू : सुमित येरुणकर याच्यावर चुनाभट्टीत अज्ञाताने 15 ते 16 गोळ्या झाडल्या. येरुणकर हा स्थानिक गुंड आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दिवसाढवळ्या गोळीबाराचा थरार झाला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून तत्काळ तपासाला सुरुवात केली. पोलिसांचे नऊ पथके आरोपीचा शोध घेत आहेत. तर अंतर्गत वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा -