मुंबई - मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी तब्बल १७ लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. २ एप्रिलला नामनिर्देशन भरण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. येत्या २९ एप्रिलला मुंबई आणि उपनगरातील ६ जागांसाठी मतदान होणार आहे. प्रामुख्याने दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मतदार संघासाठी १७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे, दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत तर काँग्रेसकडून दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा आणि दक्षिण मध्य मुंबईमधून एकनाथ गायकवाड यांनीं अर्ज दाखल केले आहेत.
- उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज -
- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ
- अरविंद सावंत - शिवसेना (३ अर्ज)
- मिलिंद देवरा - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (४ अर्ज)
- शंकर गंगाधर सोनवणे - अपक्ष
- विजय महेंद्र पंड्या - अपक्ष
- मोहम्मद नईम शेख - MIM पॉलिटिकल पार्टी
- हमीर कालिदास विजुंडा - बहुजन रिपब्लीकन सोशॅलिस्ट पार्टी
अशा ६ उमेदवारांची आज नामांकन पत्रे दाखल झाली आहेत. तसेच यापूर्वी ३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते.
- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ-
- गॉडफ्रे वॉशिंग्टन नोबल - देसिया मक्कल सक्ती कटची (२ अर्ज)
- संतोषकुमार श्रीवास्तव - अपक्ष
- अॅड. योगेश विठ्ठल मोरे - बहुजन रिपब्लीकन सोशॅलिस्ट पार्टी
- राहुल शेवाळे - शिवसेना
- अॅड. महेंद्र भिंगारदिवे - अँन्टी करप्शन डायनामिक पार्टी
- प्रिसिला सम्युअल नाडार - अपक्ष
- आरुमुगम एम. देवेंद्र - अपक्ष
- एकनाथ एम. गायकवाड - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (४ अर्ज)
- संजय सुशील भोसले - वंचित बहुजन आघाडी (४ अर्ज)
- विकास मारुती रोकडे - अपक्ष
- शितल भारत ससाणे - अपक्ष