मुंबई : अटक आरोपीविरुद्ध लैंगिक शोषणाच्या किमान 326 तक्रारी दाखल आहेत. ज्यांचा अधिक तपास केला जात आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, मुंबई गुन्हे शाखा या संशयिताबाबत मिळालेल्या माहितीवर काम करत आहे. सोशल मीडिया, वेबसाइटद्वारे ऑनलाइन वेश्या व्यवसाय सर्व्हिस ऑफर करून त्यांने अनेकांची फसवणूक केली होती. ग्राहकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन आरोपीने अनेकांना ब्लॅकमेल केले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपीला बेड्या : याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, पीडितेने गेल्या वर्षी पूर्व उपनगरातील अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मुंबई गुन्हे शाखेच्या सापळ रचत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. 26 जानेवारीला पोलीस अधिकाऱ्यांना संशयित घाटकोपर परिसरात भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याला घाटकोपरच्या असल्फा परिसरातून पकडले अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीवर देशातील विविध भागांमध्ये किमान 39 गुन्हे दाखल आहेत. ज्यात तेलंगणातील 35, झारखंडमधील 2, महाराष्ट्रातील 1 दिल्लीतील एका प्रकणाचा समावेश आहे.
सेक्सटोर्शन म्हणजे काय? वेबकॅम, मोबाईल फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे एखाद्या व्यक्तीचे लैंगिक किंवा नग्न चित्रे रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणे म्हणजे सेक्सटोर्शन होय. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणारे तरुण, व्यापारी, राजकारणाशी संबंधित लोक या रॅकेटचे बळी ठरत आहेत. यामध्ये लोकांना हनी ट्रॅपप्रमाणे आमिष दाखवले जाते. सोशल नेटवर्किंग साइटवरून कोणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. त्यातुन आरोपी ओळख वाढवून नागरिकांची फसवणुक करतात.
वर्ष गुन्हे
२०१७ १४३६
२०१८ १४९३
२०१९ २६०९
२०२० २४९९
२०२१ २८८३
२०२२ ३३०
हेही वाचा - Nitin Gadkari on Palkhi Route : आळंदी-पंढरपूर पालखी मार्ग तीन महिन्यात पूर्ण करणार - नितीन गडकरी