मुंबई : कर्मचारी वर्ग त्यांच्या दिवसातील बहुतांश वेळ कार्यालयात घालवतात. त्यामुळे त्यांचे नकळत कार्यालयातील सहकाऱ्यांशी वेगळेच नाते जोडले जाते. मात्र सर्वांची वागणून समान असेल असे नाही. त्यातल्या कांहींना गॉसीप करायला आवडतेच. मात्र, यात स्व:ताचा बळी पडू देऊ (Office Mistakes ) नका.
गॉसिपकडे दुर्लक्ष करा : कार्यालयात जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या बद्दल ( ignore gossip ) बिघडते. तेव्हा तुम्ही त्यावर आक्रमकपणे प्रतिक्रिया देता. अनेकदा गप्पाटप्पा सुरू असल्यावर त्यावर तीव्र होता. अशा वेळी तुमच्याबद्दलच्या कुजबुजांमुळे तुमच्या प्रतिमेत फरक पडतो. तर त्याकडे दुर्लक्ष करा. पुन्हा पुन्हा त्याबद्दल स्पष्टीकरण देणे चांगले नाही. शांत राहा आणि आपल्या कामाबद्दलच लोकांशी बोला इतर गोष्टींवर बोलणे थांबवा.
कामावर परिणाम होतो : जेव्हा कार्यालयात अफवा आणि कुजबुज होते, गॉसिपचा कामावर परिणाम ( gossip Effects on work ) होतो . तेव्हा तुम्ही अस्वस्थ होऊन त्याचा कामात गोंधळ होऊ शकतो. पण याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ देऊ नका. जर तुम्ही स्वतःबद्दल पॉझीटिव्हा असाल तर गॉसीपचा तुमच्यावर काहीच परिणाम होमार नाही. इतरांवर रागावल्यास त्याचा तुमच्या इमेजवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा मन लावून कामाला लागा.
वादांना प्रतिसाद देऊ नका : जर तुमच्याबद्दल अधिक अफवा पसरू लागल्या आणि तुम्हाला समजले की कोणता सहकारी तुमच्याबद्दल कुजबुज करत ( Do not respond arguments ) आहे. जेव्हा तो व्यक्ती तुम्हाला समजेल. तेव्हा त्याच्याशी भांडणे सुरू करू नका. त्यापेक्षा शांतपणे त्यांच्याशी आणि बाकीच्यांशी बोला. प्रतिमा खराब करणार्या गप्पांवर लक्ष केंद्रित करू नका. मात्र त्याचवेळी समोरच्याला त्याच्या चुका जाणवून द्या.
तुमचा मुद्दा मांडा : कार्यालयात तुमच्याबद्दल गप्पाटप्पा आणि अफवा भरपूर सुरू असताना त्याला योग्य पद्धतीने प्रतिसाद द्या. तुमची बाजू उघडपणे पण समजूतदार पद्धतीने (State your point ) मांडा. यासाठी आवाज उठवण्याची गरज नाही. भांडण करून प्रकरण मिटत नाही. यासाठी तुम्हाला योग्य तर्क द्यावे लागतील.