ETV Bharat / state

वृत्तनिवेदिकेला अश्लील मेसेज पाठविणे पडले महाग; आरोपीला ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Jul 13, 2019, 5:52 PM IST

संबंधीत आरोपीने पीडित वृत्तनिवेदिकेला टीव्हीवर पाहिले. त्यानंतर तिला फेसबुकवर शोधले आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई - सोशल मीडियाच्या माध्यमातून एका वृत्तनिवेदिकेला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला पश्चिम बंगाल येथील कल्याणी परिसरातून अटक करण्यात आली आहे. आतानू रवींद्र कुमार असे आरोपीचे नाव असून मुंबई पोलिसांच्या कफ परेड पोलिसांनी ही कारवाई केली.

अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला अटक

संबंधीत आरोपीने पीडित वृत्तनिवेदिकेला टीव्हीवर पाहिले. त्यानंतर तिला फेसबुकवर शोधले आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. मात्र, पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले. तिचे लग्न झाले आहे, असे त्याला समजल्यानंतर त्याने तिच्या पतीला देखील अश्लील मेसेज पाठवले. त्यामुळे तिने कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला पश्चिम बंगाल येथील कल्याणीमधून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची १६ जुलैपर्यंत पोलीस रवानगी करण्यात आली आहे.

Intro:सोशल मीडियाचा वापर करून एका महिलेला त्रास देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या कफ परेड पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील कल्याणी परिसरामधून अटक केली आहे. वृत्त निवेदिका असलेल्या पीडित महिलेला गेल्या काही दिवसांपासून सदरचा आरोपी अश्लील मेसेज फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून पाठवून त्रास देत होता. या संदर्भात सुरुवातीला या पीडित महिलेने दुर्लक्ष केले. मात्र त्रास देण्याचे प्रमाण न थांबल्यामुळे सरतेशेवटी या प्रकरणाची तक्रार मुंबई पोलिसांच्या कप परेड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली

Body:पोलिसांनी याप्रकरणी आतानू रवींद्र कुमार या आरोपीला अटक केली आहे पीडित महिलेला टीव्हीवर पाहिल्यानंतर फेसबुकवर तिच्या नावाने सर्च करून हा आरोपीने पिडितेला मेसेंजर च्या माध्यमातून अश्लील मेसेज पाठवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या तरुणीचे लग्न झालेले आहे असे कळल्यानंतर या आरोपीने तिच्या पतीला सुद्धा अशाच प्रकारचे अश्लील मेसेज पाठवण्याचा काम सुरू केलं. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींची रवानगी 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत केलेली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.