ETV Bharat / state

Vanchit Bahujan Aghadi Morcha : ओबीसी आरक्षणासाठी 'वंचित'चा विधान भवनावर मोर्चा

ओबीसी आरक्षणासाठी ( Obc Reservation ) वंचित बहुजन आघाडीने  ( Vanchit Bahujan Aghadi ) प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर धडक मोर्चा काढला. यावेळी विधानभवनावर अचानक कार्यकर्त्यांनी धडक दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे जमाव अधिक आक्रमक झाला.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Dec 23, 2021, 5:08 PM IST

मुंबई - राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Maharashtra Winter Session 2021 ) दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar Protest Obc Reservation ) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने ( Vanchit Bahujan Aghadi ) विधानभवनावर मोर्चा काढला. यावेळी, ओबीसींना आरक्षण ( Obc Reservation ) मिळावे या मागणीने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

लढा गावपातळीवर नेणार

विधानभवनावर काढलेल्या मोर्चावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar Protest Obc Reservation ) म्हणाले की, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळायला हवे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. एकदा जनगणना केली तर राजकीय आरक्षणही आपोआप मिळेल. पण, केंद्र आणि राज्य सरकारला ओबीसींना आरक्षणच ( Central And State Government Obc Reservation ) द्यायचे नाही. मंडल आयोगापेक्षाही आता मोठी लढाई असेल. आम्ही हे आंदोलन थांबवणार नसून, राज्यभरात घेऊन जाऊ. तालुका आणि गावपातळीपर्यंत ही लढाई लढली जाईल, असे स्पष्ट करत सरकारने केवळ ओबीसीच नव्हे मराठा आरक्षणाचंही वाटोळं केल्याचा आरोप त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टाने दिली आहे स्थगिती

सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भातील ( Supreme Court Obc Reservation ) महाराष्ट्र शासनाचा ( Maharashtra Government )अध्यादेश स्थगित केल्याने मोठा झटका बसला. त्यानतंर निवडणूक आयोगाने ( Election Commission ) राज्यातील पोटनिवडणुका, नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर घोषित केल्या. या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होत असल्याने, त्याविरुध्द वंचित बहुजन आघाडीने विधान मंडळावर धडक दिली. ओबीसींना आरक्षण मिळायलाच हवे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, विधानभवनावर अचानक कार्यकर्त्यांनी धडक दिल्याने गोंधळ निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यामुळे जमाव अधिक आक्रमक झाला आणि घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना मध्यस्थी करण्याचे सांगत, परिस्थिती आटोक्यात आणली.

हेही वाचा - BREAKING : शक्ती कायदा विधानसभेत एकमताने मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.