मुंबई : जेवणामध्ये आपण बीट वापरतो. त्याचा गडद लाल रंग भातात मिसळल्यावर भात पूर्ण लाल होतो. इंद्रधनुष्यामध्ये विविध रंग आपल्याला दिसतात. धुलीकण हवेत पसरल्यावरही आपल्याला विविध रंगछटा नजरेस येतात. रोजच्या जगण्यात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा पदोपदी भौतिक तसंच रसायनशास्त्राशी संबंध येतो. यासाठी रसायन शास्त्रातील मूलभूत सिद्धांत, संज्ञा आणि सारणी हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्राध्यापिका त्यांना पुरस्कार घोषित केला गेलेला आहे. मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर येथे सातत्यानं ध्यासमग्न राहून काम करणाऱ्या प्राध्यापिका सविता लाडगे यांना इंग्लंडमधील प्रख्यात अशा रॉयल सोसायटी ऑफ केमेस्ट्री यांच्यावतीनं रसायनशास्त्राच्या योगदानाबद्दल पुरस्कार घोषित केलेला आहे. सुमारे साडेचार लाख रुपयाचा हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. या पुरस्काराचं नाव 'नायहोम शिक्षण पुरस्कार' असं आहे.
रसायनशास्त्र विद्यार्थी कार्यक्रम : प्राध्यापिका सविता लाडगे यांनी रसायनशास्त्राच्या शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी. त्यातील खोलवर संकल्पनात्मक ज्ञान याकडे आजची दुनिया पाहत नाही, त्यात विद्यार्थ्यांनी रमावे यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना जागतिक पुरस्कार मिळालेले आहेत. रसायनशास्त्रामधील मूलभूत सिद्धांत सोडवणं, विविध प्रमेयांची प्रयोगांची रचना करणं, त्यातल्या त्रुटी शोधणं, सांख्यिकीच्या आधारे विश्लेषण करणं आणि नवनवीन ज्ञानाची क्षितीज पादाक्रांत करणं हे त्यांनी सातत्यानं अविरत केलेलं आहे. त्यामुळे 2023 यावर्षीचा रसायन शास्त्रातील हा मानाचा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. पुढील दोन महिन्यात तो इंग्लंडमध्ये एका समारंभात दिला जाणार आहे.
रसायनशास्त्राबाबत प्रचंड आवड : प्राध्यापिका सविता लाडगे यांनी रसायन शास्त्राच्या या पुरस्काराच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या "लहानपणापासूनच रसायनशास्त्राबाबत प्रचंड आवड होती ती उत्तरोत्तर वाढली. जेव्हा प्राध्यापिका म्हणून शिकवायला सुरुवात केली. तेव्हा त्यातील अथांग सागराची कल्पना आली. मुळात विज्ञानाबाबत कुतूहल निर्माण होण्यासाठी तसं वातावरण आजूबाजूला असणं गरजेचं आहे. जे घरात शाळेत समाजात महाविद्यालयात आणि संशोधन केंद्रात असलेच पाहिजे. मी रसायन शास्त्रातील मूलभूत वैज्ञानिक बाबी शोधण्याचा ध्यास घेतला आणि या ध्यासाला रॉयल केमिस्ट्री ऑफ सोसायटी इंग्लंड यांनी पुरस्कारानं सन्मानित केलं त्यामुळं प्रचंड जबाबदारी वाढलेली आहे."या संदर्भात इंग्लंड येथील रॉयल सोसायटी ऑफ केमेस्ट्रीचे प्रमुख डॉक्टर हेलन पेन म्हणाले, "भारतातील प्राध्यापिका सविता लाडगे यांनी रसायन शास्त्रामध्ये विज्ञानामध्ये जे योगदान दिलेलं आहे. नवनवीन कल्पनापर्यंत पोहोचणं आणि त्याद्वारे मानव समाजाच्या आव्हानांचा सामना करणं यासाठी ते निश्चित मदतकारक ठरणार आहे."
हेही वाचा :