ETV Bharat / state

किशोरी पेडणेकर; नर्स ते मुंबईच्या  महापौरपदापर्यंतचा प्रवास

author img

By

Published : Nov 22, 2019, 4:27 PM IST

मुंबईच्या ७७ व्या महापौर म्हणून त्यांनी आज पदभार स्वीकारला. किशोरी पेडणेकर (५७ वर्ष) या जेएनपीटीमध्ये नर्स म्हणून नोकरी करत होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९९२ पासून शिवसैनिक म्हणून पेडणेकर यांनी निष्ठेने काम केले आहे. सुरुवातीच्या काळात नर्सिंगची सेवा सांभाळतानाच निष्ठावंत, कट्टर आणि धडाडीच्या शिवसैनिक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई - मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौर पदावर सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेच्या मुलुख मैदानी तोफ म्हणून किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. त्यांनी अनेकवेळा माध्यमांसमोर पक्षाची बाजू रोखठोकपणे मांडली आहे.

वरळी विधानसभा निवडणुकीत शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यात त्यांचा सहभाग महत्वाचा होता. यामुळे पेडणेकर यांचा महापौर पदासाठी मातोश्रीकडून विचार करण्यात आला आहे. मुंबईच्या ७७ व्या महापौर म्हणून त्यांनी आज पदभार स्वीकारला. किशोरी पेडणेकर (५७ वर्ष) या जेएनपीटीमध्ये नर्स म्हणून नोकरी करत होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९९२ पासून शिवसैनिक म्हणून पेडणेकर यांनी निष्ठेने काम केले आहे. सुरुवातीच्या काळात नर्सिंगची सेवा सांभाळतानाच निष्ठावंत, कट्टर आणि धडाडीच्या शिवसैनिक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.

त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी उपविभाग संघटक, विभाग संघटक, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्क संघटक अशा पदांवर काम केले. सध्या त्या रायगड जिल्हा व शिर्डी महिला संपर्क संघटक अशा जबाबदार्‍या सांभाळत आहेत. २००२ मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. २००७ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. २०१२ आणि २०१७ मध्ये त्या पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. २०१२ मध्ये त्यांनी प्रभाग समिती अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष, शहर स्थापत्य समिती अध्यक्षा, सुधार-स्थायी समिती सदस्य म्हणून जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा असताना पेडणेकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाकरिता जेंडर बजेट मंजूर करून घेतले. युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वैविध्यपूर्ण दृष्टीकोनातून साकारलेल्या विविध योजना आणि कामांमुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्या उत्कृष्ट नगरसेविका ठरल्या आहेत.

मुंबईच्या महापौरपदासाठी यशवंत जाधव, मंगेश सातमकर, विशाखा राऊत, आशिष चेंबूरकर, रमाकांत रहाटे, बाळा नर, किशोरी पेडणेकर आदी नावे चर्चेत होती. महापौर पदासाठी अर्ज भरण्याच्या काही तास आधीपर्यंत शिवसेनेकडून महापौर पदाचे उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यासाठी सेना नेते अनिल परब यांना पालिका मुख्यालयात पाठवण्यात आले होते. परब यांच्या समोरच सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी किशोरी पेडणेकर यांच्या नावाला कडाडून विरोध केला. अखेर परब यांनी राऊत यांची समजूत घातल्यावर पेडणेकर यांचे नाव महापौरपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले.

Intro:मुंबई - मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उप महापौर पदावर सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड होणार आहे. शिवसेनेच्या मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख पेडणेकर यांची ओळख आहे. त्यांनी पक्षाची बाजू अनेकवेळा मीडियासमोर रोखठोक मांडली आहे. वरळी विधानसभा निवडणुकीत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यात त्यांचा सहभाग महत्वाचा होता. यामुळे पेडणेकर यांचा महापौर पदासाठी मातोश्रीकडून विचार करण्यात आला आहे. मुंबईच्या ७७ व्या महापौर म्हणून त्यांनी आज पदभार स्वीकारला.  Body:किशोरी पेडणेकर (५७ वर्ष) या जेएनपीटीमध्ये नर्स म्हणून नोकरी करत होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन १९९२ पासून शिवसैनिक म्हणून पेडणेकर यांनी निष्ठेने काम केले आहे. सुरुवातीच्या काळात नर्सिंगची सेवा सांभाळतानाच निष्ठावंत, कट्टर आणि धडाडीच्या शिवसैनिक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यानंतर महिला उपविभाग संघटक, विभाग संघटक, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्क संघटक अशा पदांवर काम केले असून सध्या त्या रायगड जिल्हा व शिर्डी महिला संपर्क संघटक अशा जबाबदार्‍या सांभाळत आहेत. २००२ मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. २००७ मध्ये त्यांनी निवडणूक लढलावली नव्हती. २०१२ आणि २०१७ मध्ये त्या पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. २०१२ मध्ये प्रभाग समिती अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष, शहर स्थापत्य समिती अध्यक्षा, सुधार-स्थायी समिती सदस्य म्हणून जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा असताना पेडणेकर यांनी महिलाच्या सक्षमीकरणाकरिता जेंडर बजेट मंजूर करून घेतले. युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वैविध्यपूर्ण दृष्टीकोनातून साकारलेल्या विविध योजना आणि कामांमुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्या उत्कृष्ट नगरसेविका ठरल्या आहेत.  

मुंबईच्या महापौरपदासाठी यशवंत जाधव, मंगेश सातमकर, विशाखा राऊत, आशिष चेंबूरकर, रमाकांत रहाटे, बाळा नर, किशोरी पेडणेकर आदी नावे चर्चेत होती. महापौर पदासाठी अर्ज भरण्याच्या काही तास आधी पर्यंत शिवसेनेकडून महापौर पदाचे उमेदवार कोण हे जाहीर करण्यात आले नव्हते. त्यासाठी सेना नेते अनिल परब यांना पालिका मुख्यालयात पाठवण्यात आले होते. परब यांच्या समोरच सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी किशोरी पेडणेकर यांच्या नावाला कडाडून विरोध केला. अखेर परब यांनी राऊत यांची समजूत घातल्यावर पेडणेकर यांचे नाव महापौरपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले.

बातमीसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांचा फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.