ETV Bharat / state

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णसंख्या एका दिवसात तीन पटीने वाढली

author img

By

Published : Apr 11, 2023, 10:37 PM IST

Updated : Apr 11, 2023, 10:58 PM IST

राज्यात काल आणि मुंबईत नोंद झालेल्या कोरोना विषाणू रुग्णांच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांची संख्या तीन पटीने वाढली आहे. रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मुंबईत रुग्णालये, पालिका कार्यालये याठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांनीही मास्क लावण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Maharashtra Corona Update
कोरोना रुग्णसंख्या एका दिवसात तीन पटीने वाढली

मुंबई: राज्यात काल १० एप्रिलला ३२८ रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली होती. आज ११ एप्रिलला त्यात वाढ होऊन ९१९ रुग्णांची नोंद झाली आहे. आजही १ मृत्यू झाला आहे. ७१० रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५१ हजार १७६ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४६१ मृत्यूची नोंद झाली आहे. ७९ लाख ९७ हजार ८४० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात ४८७५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील मुंबईत १४७८, ठाणे ८९६, पुणे ७३१, नागपूर ४५१, रायगड २२३, पालघर १३७, सांगली १२८, सातारा ११०, उस्मानाबाद १०१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत २४२ नवे रुग्ण: मुंबईत काल ९५ रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात वाढ होऊन २४२ रुग्णांची नोंद झाली आहे. काल मुंबईत १ मृत्यू झाला होता. आज एकही मृत्यू झालेला नाही. आज २१८ रुग्ण बरे झाले आहेत. ११० रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असून त्यापैकी ३७ रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. मुंबईत सध्या १४७८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ११ लाख ५९ हजार २२५ रुग्णांची तर १९ हजार ७५० मृत्यूची नोंद झाली आहे.

पालिका सज्ज: कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढल्यास खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, गंभीर आजार असलेल्या नागरिकांनी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयात आणि कार्यालयात मास्क वापरावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनापासून बचाव: कोरोनाची लक्षणे आणि सर्दी झालेल्या रुग्णांमधील लक्षणे सारखी दिसतात. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशावेळी नागरिकांनी घाबरून न जाता नेहमीप्रमाणे तपासणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी आवाहन केले. तसेच संसर्गजन्य रोगांची साथ असताना स्वत: बरोबर इतरांची काळजी घ्या, असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीला एकही कोरोना रुग्ण किंवा संशयित रुग्ण नाही. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पुणे- मुंबईहुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत समाज माध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

हेही वाचा: Uddhav Thackeray met Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चा मात्र गुलदस्त्यातच

Last Updated : Apr 11, 2023, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.