मुंबई - कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (एनएसटीआय) मुंबईकडून हँडवॉश मशीन विकसित करण्यात आली असून चुनाभट्टी पोलीस ठाण्यामध्ये बसवण्यात आले आहे.
या मशीनला हात लावण्याची किंवा कळ दाबण्याची गरज नाही, पुढे उभारल्यानंतर आपोआप हातात सॅनिटायझर पडते. याचा पोलिसांसह तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित वापर करता येणार आहे.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 हजार 506 झाला आहे, यात 18 हजार 668 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 5 हजार 63 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 775 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, मागील 24 तासात देशभरात 1 हजार 429 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर 57 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.