मुंबई : पावसाळ्यात प्रचंड मोठा पूर येतो. किंवा उन्हाळ्यात प्रचंड ऊन पडते. मात्र त्याची आपल्याला अचूक पूर्वसूचना शासनाकडून मिळणे ( Satellite Images through GIS systems ) अवघड आहे. पण ही जर पूर्व सूचना किमान आधी आपल्याला जर प्राप्त होत असेल. तर किंवा वातावरण बदलत असेल आणि त्याची पूर्व सूचना काही प्रमाणात आपल्याला मिळाली. किंवा आपल्या नद्यांचे प्रदूषण होत आहे याची आपल्या सूचना घर बसल्या मिळाली तर त्यामुळे मानव जातीचे भले होणार आहे. यासंदर्भात आयआयटी मुंबईने ( IIT Mumbai ) खास प्रकल्प हाती घेतलेला आहे जाणून घेऊया सविस्तरपणे.
अचूक अंदाजासाठी डेटाचा उपयोग : इंधनाचा शोध लागेपर्यंत मानव समाजाचा झपाट्याने विकास झालेला नव्हता. मात्र इंधनाचा शोध लागला आणि इंधन हे सगळ्या जगाचे अर्थ चक्राचे आधार झाले. वाहनांसाठी इंधन हे महत्वाचा शोध ठरले. त्यामुळे इंधनाला म्हणजे ऑइलला जसे महत्त्व आहे. तसे आजच्या युगात डेटा हा ऑइल सारखाच महत्त्वाचा भाग झालेला आहे. आयआयटी मुंबईने या महत्त्वाच्या शोध प्रकल्पात शासनाच्या सूचनेनुसार पुढाकार घेतला आहे. राज्यातील जनता आपल्या स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईल द्वारे जीआयएस मॅपिंग करू शकेल आणि त्याचा डेटा ते ओपन सोर्स वेबसाईटवर अपलोड करू शकतील.तो डेटा सॅटेलाईट सोबत जोडला जाईल अशी सुविधा आता निर्माण होणार आहे. ही प्रणाली आहे जी आय एस अर्थात भौगोलिक माहिती प्रणाली.
कसा अपलोड करणार डेटा : तुम्ही आता रस्त्याने जात आहात. जाताना तुम्हाला नदी लागली आणि पुलावरून तुम्हाला नदी प्रदूषित झालेली दिसते ( Climate change forecasting ). तुम्ही जर त्या प्रदूषित झालेल्या नदीचे सुव्यवस्थित फोटो काढले .छोटासा व्हिडिओ बनवला आणि त्याची अचूक माहिती तुम्ही दिली. आयआयटीने दिलेल्या ओपन सोर्स संकेतस्थळावर अपलोड केली. तर त्या माहीतीचा उपयोग आयआयटीमध्ये बसणाऱ्या माणसाला किंवा शासनाच्या कार्यालयात बसणाऱ्या माणसाला किंवा दिल्लीमध्ये बसणाऱ्या माणसाला उपयोग होऊ शकतो. तसेच केवळ शासन नव्हे तर भारतीय नागरिकांना होईल.हा रियलटाईम डेटा आधारे काही क्षणात माहिती सार्वत्रिक होईल. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमद्वारे एकाच वेळी अपलोड केलेली माहिती कोठेही बसून पाहता येते विश्लेषण करता येते.नियोजनात हा डेटा महत्वाचा ठरणार आहे.
उदाहरणातून समजावून घेऊ : दुसऱ्या उदाहरणातून आपण समजावून घेऊ. एक शेतकरी आहे . शेताच्या बांधावर प्रचंड पावसामुळे नुकसान ( Rain forecast ) झाले आहे. किंवा हवामान बदलाबद्दल शेतकऱ्याला काही प्रमाणात अधिक अंदाज आला आहे. किंवा पूर येणार बाबतची माहिती प्रथम मिळाली ( Flood warning ) तर तो अंदाज शेतकरी आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करून अपलोड करू शकतो. आपल्या जागेवरून आयआयटी मुंबईने जारी केलेल्या अधिकृत ओपन सोर्स वेबसाईटवर अपलोड करू शकतो. या डेटाच्या आधारे नियोजन, धोरण, आखणी करणारे अंमलबजावणी करणारे यांना त्याचा आधार होणार. तसेच जिल्हाधिकारी तहसीलदार, तलाठी, शिक्षक,ग्रामविकास तसेच विविध सरकारी अधिकारी कर्मचारी यांना देखील वेगात अचूक माहिती मिळेल. ही माहिती अपलोड केली की ती सॅटॅलाइटच्या सोबत जोडली जाणार. त्यामुळे कोणालाही कुठूनही माहिती पाहता येईल, वाचता येईल तिचे विश्लेषण करता येईल आणि त्यावरून उपाययोजना सुचवता येईल. याने समाजाचे नुकसान कमीत कमी होईल.
भारत सरकार आणि आय आय टीचा प्रथमच प्रयत्न : हा प्रकल्प भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभाग अंतर्गत तसेच ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि आयआयटी मुंबई यांच्या वतीने सुरू झालेला आहे. अनोखी पद्धत वापरून भारतात आयआयटीने पहिल्यांदाच रियल टाईम डेटा तो अचूक डेटा नोंदवण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न सुरू केलेत. यामध्ये कोणताही भारतीय नागरिक सहभाग घेऊ शकतो.ज्याला किमान वाचता लिहिता येतं असे कोणतेही भारतीय लोकं हे वापरू शकतील.
लोक कसा सहभाग घेऊ शकणार : कॉलेजमधील मुले कोणताही सुजाण नागरिक ज्याला किमान अँड्रॉइड मोबाईल हाताळता येतो. असे कोणीही नागरिक आपल्या शेतीचा पाण्याचा, नदी, नाले पाऊस, जंगल सांस्कृतिक वारसा ,माती मातीचे परीक्षण असा विविध प्रकारचा डेटा स्वतः जमवून तो ओपन सोर्स पद्धतीने आयआयटीच्या वेबसाईटवर अपलोड करू शकणार आहेत. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आणि जतन केलेले सर्व किल्ले असेल किंवा मशिदी, दर्गे असेल नाहीतर पंढरपूर सारखे सांस्कृतिक वारसा ठिकाण असेल. अन्यथा अजंता वेरूळ येथील बौद्ध लेण्या असतील त्याबाबत त्याची प्रत्यक्ष वस्तूस्थिती जनतेला देखील या ओपन सोर्स वेबसाईटवर अपलोड करता येईल. जेणेकरून एकाला मिळालेली माहिती ती सार्वत्रिक होईल. आयटी मुंबईची टीम या सर्व गोष्टींवर देखरेख करेल. विविध शासकीय किंवा खाजगी संस्था याबाबत प्रशिक्षण आयोजित करू शकतात आणि मग नागरिक प्रशिक्षण घेऊन डेटा अपलोड करू शकतात.याचा उपयोग आपल्या गावासाठी देखील करू शकतात .
आय आय टी संशोधकाचा प्रयत्न : या संदर्भात मूळचे तामिळनाडू स्थित मात्र आयआयटी मुंबईमध्ये या संपूर्ण प्रकल्पाची धुरा वाहणारे संशोधक पन्नन चेन्नस्वामी यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत करताना हे कशा पद्धतीने जीआयएस मॅपिंग होतं हे सविस्तर मांडलं. 'आपण जर आज पाहिलं तर उत्तराखंडमध्ये अचानक आलेला महापूर मुंबईमध्ये अचानक झालेला तुफान पाऊस किंवा अचानक वातावरण बदलल्यामुळे प्रचंड थंडी पडते. क्लायमेट चेंज अर्थात वातावरणात अचानकपणे बदल होतात.भयंकर ऊन पडतं या संदर्भात मनुष्यहानी होते. प्राण्यांची देखील हानी होते. मात्र जीआयएस मॅपिंग द्वारे रियल टाईम डेटा आपण प्रत्येक नागरिक अचूकतेने भरू शकलो. अपलोड करू शकलो. त्याची पूर्व सुचना सर्व यंत्रणांना मिळेल.तर ही होणारी हानी कमीत कमी होईल आणि या डेटाचा उपयोग मानव जीवन सुखी करण्यासाठी करता येईल. तसेच उदाहरणार्थ मुंबईतील पवई या ठिकाणी तलाव आहे. हा तलाव प्रदूषित होऊन होऊन आत्ता कुठल्या स्थितीमध्ये आहे. वीस वर्षांपूर्वी कुठल्या स्थितीमध्ये होता. हे देखील आपल्याला या क्षणी देखील ओपन सोर्स वेबसाईटवरून पाहता येतं किंवा तुम्ही त्या जागी असाल तर तुम्ही तेथून डेटा अपलोड करू शकता. म्हणजे आमच्या असलेल्या डेटामध्ये उत्क्रांती होऊन लोक स्वतःच्या आणि शासनाच्या माहिती ज्ञानात भर घालू शकता.'
जेष्ठ संशोधक काय म्हणतात : तर मुंबई आयआयटी मधील जेष्ठ संशोधक प्राध्यापक जितेंद्र शहा यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत केली ते म्हणाले की, 'वातावरणीय बदल शेती, पाणी याबद्दल शासनाने महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतलाय. नद्यांचे पुनरुज्जीवन हा शासनाने प्रकल्प नुकताच सुरू केलेला आहे. आणि जसं एकेकाळी ऑइल म्हणजे इंधनाशिवाय दुनिया चालू शकत नाही. तसंच आजच्या युगात डेटा म्हणजे ऑइल आहे. असं समजून जर नदीच्या संदर्भात तिच्या वस्तुस्थिती बाबत अचूक माहिती शेतकऱ्यांनी, जनतेने, विद्यार्थ्यांनी नागरिकांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी अचूक भरली.तर त्याचा फायदा नियोजन करण्यासाठी होणार आणि मानव जातीच्या भल्यासाठी होणार. यवतमाळमध्ये किंवा मराठवाड्यातील काही तालुक्यात अचानक नागरिकांना किडनी खराब होण्याचे प्रमाण वाढले. याचे कारण त्या भागातील पिण्याच्या पाण्यामध्ये प्रदूषित काही द्रव्य होती. आणि जेव्हा त्याचा वैज्ञानिक रीतीने अभ्यास केला तेव्हा हे लक्षात आलं. जर आपल्या भागात असं प्रदूषित पाणी आहे. हे जर माहिती झालं आणि तो डेटा अपलोड केला. तर लवकरात लवकर त्याबद्दल उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेला जागे करता येईल. यामध्ये विशेष करून स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय, उच्च शिक्षण संस्था ,शाळेतील मुलं ,कोणीही भारतीय नागरिक यामध्ये सहभागी होऊन डेटा अपलोड करू शकतो. मात्र त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.'