ETV Bharat / state

Gangster Arrested Mumbai : पॅरोलवरून फरार असलेल्या 'या' कुख्यात गँगस्टरला बेड्या, वाचा काय आहे प्रकरण

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पॅरोलवरून फरार झालेला (Absconding from parole ) कुख्यात गॅंगस्टरला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने अटक (Notorious gangster arrested in Mumbai) केली आहे. ग्रब्रियल हंस मेबन (६२) असे या आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपी १९९५ सालापासून कारागृहात बंदिस्त होता. (Gangster Arrested Mumbai )

Gangster Arrested Mumbai
कुख्यात गँगस्टरला बेड्या
author img

By

Published : Jan 9, 2023, 10:39 PM IST

मुंबई : पेरॉलवरून फरार झालेल्या (Absconding from parole) कुख्यात गुंडाला अटक करण्यात (Notorious gangster arrested in Mumbai)) मुंबई पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यात कुख्यात गॅंगस्टर ग्रब्रियल हंस मेबन, वय ६२ वर्षे आहे. या आरोपीवर खून, अपहरण, खुनाचा प्रयत्न, आणि खंडणी यासारख्या १५ पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, कल्याण, ठाणे, येथील भादंवि कलम ३०२. १२०(ब) अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Gangster Arrested Mumbai )

१९९५ सालापासून कारागृहात बंदिस्त : ग्रब्रियल हंस मेबन आरोपी हा सन १९९५ सालापासून कारागृहात बंदीस्त होता. दरम्यानच्या काळात कोव्हीड - १९ च्या प्रादुभाव वाढल्याने त्याला ९ मे २०२० ला ४५ दिवसांकरीता कोव्हीड १९, आपत्कालीन अभिववन रजेवर कारागृहातून सोडण्यात आले होते. ग्रब्रियल हंस मेबन हा गँगस्टर सय्यद चाळ, शांतीनगर, एम. आय. डी. सी. १२ वा रस्ता अंधेरी पूर्व, मुंबई या पत्यावर राहत होता. ग्रब्रियल हंस मेबन याला १७ मे २०२२ला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात हजर होणे गरजेचे होते. परंतु नमूद आरोपी स्वतःची अटक टाळण्यासाठी लपून रहात होता म्हणून २ डिसेंबर २०२२ला एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता.

अशी केली अटक : त्याप्रमाणे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष- १० तील पोलीस हवालदार माने यांना गुंडाबाबत माहिती मिळाली की, ग्रब्रियल हंस मेबन या आरोपी नाहर अमृत शक्ती, साकीनाका, परिसरात वास्तव्यास आहे. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता वर नमुद गुन्हयातील आरोपी असल्याची खात्री झाल्याने पुढील कार्यवाहीकरीता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांची विशेष कामगिरी : ही यशस्वी कामगिरी पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण- १) गुन्हे शाखा, कृष्ण कान्त उपाध्याय, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि पश्चिम) काशीनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व कक्ष १० वे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या पर्यवेक्षणाखाली कक्ष १०, पोलीस अंमलदार पोलीस हवालदार शेटे, पोलीस हवालदार धारगळकर, पोलीस हवालदार माने, पोलीस हवालदार धनवडे, पोलीस हवालदार नलावडे, पोलीस हवालदार जगताप, पोलीस हवालदार निर्मळे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाईसोनवणे यांनी पार पाडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.