ETV Bharat / state

Mumbai News : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कोणतीही कपात नाही, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्याची माहिती समोर आली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे मोठा संताप व्यक्त करण्यात येत होता. परंतु आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची कुठलीही सुरक्षा काढून घेण्यात आली नाही, अशी माहिती, मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी बाळसिंग रजपूत यांनी दिली.

Uddhav Thackeray And  Aditya Thackeray
उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षित कोणतीही कपात नाही
author img

By

Published : Jun 21, 2023, 7:43 PM IST

मुंबई : आज मुंबईत एकीकडे आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तींयांवर ईडीने ठिकठिकाणी छापे टाकले आहेत, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, मुंबई शहरातील कोणत्याही व्यक्तीची सुरक्षा अथवा संरक्षण काढून घेतलेले नाही किंवा कमी केलेले नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी बाळसिंग रजपूत यांनी दिले आहे.

ही केवळ अफवा : गेल्या काही दिवसापूर्वी काही नेत्यांना धमकीचे फोन आल्याचे समोर आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह खासदार संजय राऊत यांनाही धमकीचे फोन आले होते. आता गृह विभागाने मातोश्री परिसर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती ही केवळ अफवा असल्याचे, मुंबई पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर समोर येत आहे. दोन दिवसापूर्वीच ठाकरे कुटुंबियांतील सुरक्षेत कपात केली असल्याचे बोलले जात होते. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतील एक एस्कॉर्ट व्हॅन काढून घेण्यात आली असल्याची केवळ चर्चा असून, त्यात तथ्य नाही. मातोश्रीवरीलही बंदोबस्त कमी केला आहे ही देखील अफवा आहे.

झेड प्लस सुरक्षा दिली होती : मुंबईत उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान येथे विशेष सुरक्षा देण्यात आली होती. यातील आता एक एस्कॉर्ट व्हॅन कमी करण्यात आलेली नाही. तर २०१८ मध्ये राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली होती. याअगोदर त्यांना फक्त झेड श्रेणीतील सुरक्षा दिली होती. यात त्यांना बुलेट प्रूफ स्कॉर्पियो कार दिली होती. यात मुंबई पोलिसांतील एक अधिकारी आणि चार कॉन्स्टेबल तैनात केले होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Aaditya Thackeray विरोधकांना ईडीची भीती आम्ही जयंत पाटलांच्या पाठिशी उभे
  2. Aaditya Thackeray 20 जून मिंधे गटाचा जागतिक खोके दिन आदित्य ठाकरेंचा घणाघात
  3. Sanjay Raut चोर मंडळ विधानाबद्दल संजय राऊतांवर कारवाई करा विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षांचे सचिवांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.