ETV Bharat / state

एसटीची विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत - मुंबई जिल्हा बातमी

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरू आहेत. सध्यस्थितीला साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बस सेवेद्वारे दररोज सरासरी 67 लाख प्रवाशांना नियमित व सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा एसटी महामंडळामार्फत पुरविली जाते.

विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत
author img

By

Published : Nov 20, 2019, 8:18 AM IST

मुंबई - सर्वसामान्य प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी आधुनिक तंत्रज्ञान व अधिक सोयी असणाऱ्या विना वातानुकूलित शयन-आसन (sleeper sitter) बसचा लोकार्पण सोहळा परळ बसस्थानकात पार पडला. सर्वसामान्य प्रवाशी रोहित धेंडे यांच्या हस्ते व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या प्रमुख उपस्थितीत परळ बस आगारात परेल-भटवाडी (पाटगांव ) ही बस सोडून हा सोहळा संपन्न झाला.

विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत

हेही वाचा - अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह 8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गासाठी

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरु आहेत. सध्यस्थितीला साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बस सेवेद्वारे दररोज सरासरी 67 लाख प्रवाशांना नियमित व सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा एसटी महामंडळामार्फत पुरविली जाते. शयन आणि आसन अशा नवीन प्रकारच्या 16 बसेस आमच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मुंबईतून महामार्गावर गाडी काढण्यासाठी वाहतूककोंडीमूळे खूप वेळ लागतो, यावर काही मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे देओल यांनी सांगितले.

  • आरामदायी शयन-आसन बसची वैशिष्ट्ये -
  1. सदर बस 12 मीटर लांबीची असून मजबूत अशा माईल्ड स्टील मध्ये बांधण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनामध्ये प्रवाशांना पुरेशी जागा उपलब्ध आहे.
  2. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसमध्ये 30 आरामदायी पुश बॅक आसने व 15 शयन (बर्थ) आहेत.
  3. सदर गाडीला हवेचा अवरोध कमी होण्यासाठी एरोडायन्यामिक आकार देण्यात आलेला असून पुढील व मागील शो आकर्षक एफआरपी मध्ये तयार केलेला आहे.
  4. पुढील व मागील बाजूस एलईडी मार्गफलक बसविलेले आहेत.
  5. चालक कॅबिनमध्ये अनाऊन्सिंग सिस्टीम बसविली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहेड पार्टीशनर हूटर बसविण्यात आलेला असून त्याचे बटण चालक कक्षात देण्यात आलेले आहे.

Intro:मुंबई
लाल परी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस आता कात टाकत आहेत. महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या सेवेत रात्रीच्या प्रवासासाठी आधुनिक तंत्रज्ञान व अधिक सुखसोयींनी युक्त अशी विना वातानुकूलित शयन-आसन (sleeper - sitter) व्यवस्था असलेल्या नवीन बसचा लोकार्पण सोहळा परळ बसस्थानकात आज पार पडला. यावेळी सर्वसामान्य पहिल्या प्रवाशी असलेल्या रोहित धेंडे हस्ते व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या प्रमुख उपस्थितीत परळ बस आगारात परेल-भटवाडी (पाटगांव ) ही बस सोडून संपन्न झाला.Body:परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या गरजेनुसार/मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरु आहेत. सध्यस्थितीला साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बस सेवेद्वारे दररोज सरासरी 67 लाख प्रवाशांना नियमित व सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा एसटी महामंडळामार्फत पुरविली जाते. शयन आणि आसन असा नवीन प्रकारच्या 16 बसेस आमच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तसेच मुंबईतून महामार्गावर गाडी काढण्यासाठी वाहतूककोंडीमूळे खूप वेळ लागतो यावर काही मार्ग निघतो हे आम्ही बघणार आहोत असे देओल यांनी सांगितले.

महामंडळाने ३० पुश बॅक आसने व १५ प्रशस्त शयन (बर्थ) असलेली बस चालनात आणली आहे. या बसचा तिकीट दर (शयन-आसन या दोन्हीसाठी) सध्या चालनात असलेल्या निम आराम म्हणजे हिरकणी बसच्या तिकीट दरा इतका असणार आहे.

मला पहिल्या प्रवाशी असल्याचा मान मिळाला त्याचा मला खुप आनंद आहे. सर्वानी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. मी नेहमीच एस टीने प्रवास करतो असे या बसचा पहिला प्रवासी रोहित धेंडे यांनी सांगितले.

आरामदायी शयन-आसन बसची वैशिष्ट्ये

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसमध्ये 30 आरामदायी पुश बॅक आसने व 15 शयन (बर्थ) आहेत.
चालक कॅबिनमध्ये अनाऊन्सिंग सिस्टीम बसविली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहेड पार्टीशनर हूटर बसविण्यात आलेला असून त्याचे बटण चालक कक्षात देण्यात आलेले आहे.
पाठीमागील बाजूस एक रिव्हर्सिंग कॅमेरा बसविलेला असून त्याची एलईडी स्क्रीन चालक कक्षात देण्यात आलेली आहे.
या बसमध्ये खालील बाजूस बसण्यासाठी आरामदायी पुश बॅक सीटस देण्यात आलेले आहेत. सदर सीट्स पाठीमागील बाजूस 250 एम एम पर्यंत पुश बॅक देण्यात आलेला आहे.
प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा दिलेली असून मोबईल ठेवण्यासाठी पाऊच दिलेला आहे. तसेच मॅगझीन पाऊच व पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी ब्रॅकेटची सुविधा देण्यात आली आहे. तसेच पर्स अडकिवण्यासाठी हुक दिलेला आहे. प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडींग लॅम्प व निळ्या रंगाची नाईट लॅम्प या दोनही सुविधा एकत्र असलेले एलईडी लाईट बसविण्यात आलेले आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.