ETV Bharat / state

BJP on Azan Sound : मशिदीवरील लाऊड स्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण, भाजपचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

मशिदीवर लावण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरवर अजान दिली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनि प्रदूषण होत आहे, अशी तक्रार भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा ( Mangalprabhat Lodha ) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे ( CP Sanjay Pandey ) यांच्याकडे केली आहे.

Atul Bhatkhalkar
अतुल भातखळकर
author img

By

Published : Mar 29, 2022, 7:41 PM IST

Updated : Mar 29, 2022, 10:41 PM IST

मुंबई - मशिदीवर लावण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरवर अजान दिली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनि प्रदूषण होत आहे, अशी तक्रार भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा ( Mangalprabhat Lodha ) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे ( CP Sanjay Pandey ) यांच्याकडे केली आहे. लेखी पत्राद्वारे ही तक्रार करण्यात आली असून, यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर, कालिदास कोळंबकर आणि राहुल नार्वेकर उपस्थित होते. मशिदीतील अजानबाबत आपली कोणतीही तक्रार नसून, लाऊड स्पीकरवर केली जाणारी अजानमुळे ध्वनिप्रदूषण तर होतच आहे. मात्र, शाळकरी मुलांच्या अभ्यासात देखील येत आहे, असे मंगल प्रभात लोढा म्हणाले आहेत.

माध्यमांशी बोलताना भाजप आमदार अतुल भातखळकर

तसेच ध्वनी प्रदूषणाचा विरोधात मुंबई पोलिसांकडून चांगल अभियान राबवले जात आहे. मात्र, मशिदीवर लाऊड स्पीकर लावून अजान करण्यास न्यायालयाची परवानगी नाही. तरीही अजान दिली जाते. मुंबई पोलीस आयुक्तांना लाऊड स्पीकरवर बंदी आणावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर ( Bjp Mla Atul Bhatkhalkar ) यांनी केली.

गुढीपाडव्याच्या मिरवणुकीला परवानगी द्या - 2 एप्रिलला मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे. या दिवशी प्रत्येक मराठी माणूस आनंदाने, उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करतो. मात्र, अद्याप गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रांना पोलिसांकडून परवानग्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी या मिरवणूक रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज रात्रीपर्यंत स्वागतयात्रा कायदा आणि नियमानुसार काढण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात यावी. तसेच यासबंधी प्रत्येक पोलीस स्टेशनला कळवण्यात यावे. नाहीतर याविरोधात भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

हेही वाचा - Accident In Aaditya Thackeray Security : आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांना अपघात

आमदार शिवबंधन जाहीरपणे तोडत आहेत - भविष्यात शिवसेनेची भारतीय जनता पक्षाची युती होणार नाही, असे सूचक वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीत आज केले. मात्र, आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे. शिवसेनेतील आमदार निधीअभावी शिवबंधन तोडत आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. तसेच आमदार तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी कसा कमी मिळतो, हे सार्वजनिकरित्या जाहीर केले. शिवसेनेच्या आमदारांना मिळणाऱ्या निधीबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आधीच सत्य समोर आणलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी शिवसेनेकडे लक्ष द्यावे, असा सल्ला ही अतुल भातखळकर यांनी दिला.

Last Updated : Mar 29, 2022, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.