ETV Bharat / state

Nawaz Uddin Siddiqui: नवाज उद्दीन सिद्दीकी यांना त्यांच्या मुलांना भेटायला कोणीही रोखले नाही; पत्नीच्या वकिलांचा खुलासा

author img

By

Published : Mar 23, 2023, 11:05 PM IST

नवाजुद्दीन सिद्दीकी याने पत्नी आलियाचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या म्हणण्यानुसार त्याची पत्नी परक्या पुरुषासोबत राहत होती. नवाजुद्दीनची पत्नी दुबईत वास्तव्याला होती. त्यानंतर ती भारतात परतली होती. तिने अंधेरी न्यायालयांमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी विरोधात याचिका दाखल केली होती. घरगुती हिंसाचार कायद्यानुसार ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आता नवाजुद्दीन सिद्दिकी याने आपली मुले कुठे आहेत, हे माहित नाही ते जाणून घेण्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती, आणि याचिका दाखल केली आहे. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Nawaz Uddin Siddiqui
Nawaz Uddin Siddiqui

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शुकरे आणि न्यायमूर्ती खट्टा यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी सुरू होती. तेव्हा नवाजुद्दीन सिद्दिकी याच्या वकिलांनी बाजू मांडली की "बापाला आपल्या मुलांना भेटू दिले जात नाही. कोणत्याही मुलांच्या जन्मदात्याला भेटू दिले जाणे हा मुलांचा देखील हक्क आहे .आणि बापांचा देखील तो हक्क आहे. परंतु नवाजुद्दीन सिद्दिकी याची पत्नी ही पतीला आपल्या मुलांना भेटू देत नाही ;"असा स्पष्टपणे आरोप त्यांनी आपल्या याचिकेमध्ये केला.

पत्नीच्या वकिलाचा युक्तिवाद: पत्नीच्या बाजूने वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला की, कोणता पुरावा आहे. की नवाजुद्दीन सिद्दिकी हा त्या मुलांचा बाप आहे आणि पत्नीने त्यांना आपल्या मुलांना भेटण्यापासून रोखल आहे. जर नवाजुद्दीन सिद्दिकी यांना पत्नी आलिया कुठे राहते हे माहित आहे. म्हणजेच ती पत्नी आपल्या आईकडे राहत आहे ही जर भाग नवाजुद्दीन सिद्दिकी यांना माहिती आहेत तर लहान मुलं आईला सोडून जातील कुठे त्यामुळे जिथे पत्नी आहे. तिथे जवळच मुलं असतील ही साधी सोपी सहज बाब आहे तरीही नवाजुद्दीन सिद्दिकी याचे वकील मात्र ही बाब जाणीवपूर्वक का सांगत नाही ?असा सवाल पत्नी आलियाच्या वतीने अधिवक्ता यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला.

बापाला मुलांना भेटू दिले जात नाही: मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शुकरे आणि न्यायमूर्ती खाटा यांच्या खंडपीठासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. मात्र आलिया हिच्या वकिलांनी जेव्हा असे विचारले की बापाला पत्नी कुठे आहे हे माहिती आहे. मात्र बापाला मुलांना भेटू दिले जात नाही. हे जे काही ते मांडत आहे बोलत आहे. त्याचा आधार काय जर बापाला पत्नी ही तिच्या आईकडे राहते एवढी बाब माहिती आहे; तर मुलं दुसरीकडे कुठे राहतील त्यामुळेच बापाला आपल्या मुलांना भेटायला बिलकुल रोखलेले नाही, ही बाब स्पष्ट आहे. न्यायमूर्ती शुकरे आणि न्यायमूर्ती खाटा यांनी दोन्ही बाजू ऐकून याबाबत सत्तावीस मार्च 2023 रोजी न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपीठांसमोर याबाबतचे पुढील प्रक्रिया होईल असे निश्चित केले.

हेही वाचा: sexual Abuse : चिंताजनक ! दररोज चार मुलींचे होते लैंगिक शोषण ; आरटीआयचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.