मुंबई - महाराष्ट्रात भाजपला बाजुला ठेवून महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली. काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांना मंत्रीपद मिळणार असे सांगितले जात होते. त्याचवेळी आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणी नव्याने चौकशी सुरू झाल्याचे सांगण्यात येऊ लागले होते. याबाबत ईडी (सक्तवसुली संचालनालय)कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
आदर्श गैरव्यवहार प्रकरणात कोणताही तपास सुरू नसल्याचे स्पष्टीकरण ईडीने दिले आहे. यासंबंधीची माहिती ईडीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. आदर्श प्रकरणातील तपासाच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा - नव्या सरकारच्या सहा मंत्र्यांनी घेतली शपथ; अशी आहे नवनिर्वाचीत मंत्र्यांची राजकीय कारकीर्द
दरम्यान, अशोक चव्हाण यांना महाविकास आघाडीत मंत्रीपद मिळेल असे सांगितले जात होते. पण, पहिल्या टप्प्यात तरी त्यांनी शपथ घेतली नाही. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.