मुंबई : देशाची आर्थिक राजधानी नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. ड्रोनसारख्या उड्डाण क्रियांद्वारे दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली जात असतानाच मुंबई पोलिसांनी सतर्कता म्हणून नो फ्लाईंग झोन जाहीर केला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या स्थळासमेत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या परेड समारंभावेळी दहशतवादी, समाजविरोधी घटक हवाई मार्गाचा वापर करून हल्ला करू शकतात. त्यामुळे मानवी जीवन, आरोग्य, सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून मुंबईतील काही ठिकाणी उड्डाण क्रियांवर बंदी आणण्यात आली आहे.
शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे महाराष्ट्र दिन निमित्त परेड समारंभाच्या वेळी, नागरिक मोठ्या संख्येने उत्सवासाठी एकत्र येतात. त्याकरीता शिवाजी पार्क, दादर, मुंबई परिसरातील समाजविघातक कारवाया रोखण्याससाठी पुरेशी सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिले आहे. तसेच बृहन्मुंबई तथा कार्यकारी दंडाधिकारी, मला फौजदार दंड प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा कायदा ॥ ) च्या कलम १४४ नुसार पोलीस आयुक्त विशाल ठाकूर यांना अधिकार मिळतात. त्यानुसार महाराष्ट्र दिन निमित्त परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर काही आदेश दिले आहेत. या आदेशात शिवाजी पार्क, दादर येथे १ मे २०२३ला माहीम पोलीस ठाणे, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे, वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाण क्रियांना प्रतिबंध राहील असे नमूद करण्यात आले आहे.
या दिवशीपासून सुरू होणार नो फ्लाईंग झोन- हा आदेश एक मे रोजीच्या रात्री एक वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत पूर्वी मागे घेतल्याशिवाय लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अंतर्गत दंडनीय असेल. सर्व संबंधितांना वैयक्तिकरित्या नोटीस बजावली जाऊ शकत नसल्यामुळे, याव्दारे हा आदेश एकतर्फी पारित करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. लोकांच्या माहितीसाठी सर्व पोलीस ठाणे, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्तालय, सर्व पोलीस ठाणी, महानगरपालिका प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकावर आणि तहसील आणि प्रभाग कार्यालयात प्रती निकटवून ते प्रसिद्ध केले जातील, अशी देखील माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.
ड्रोनचा गैरवापर वाढला- भारत-पाक सीमेलगत ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. त्यामुळे ड्रोनच्या गैरवापराबाबत कडक नियम करण्याची गरज व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदींच्या एका सभेजवळ यापूर्वी ड्रोन आढळल्याने सुरक्षेतील त्रुटी समोर आली होती. ड्रोनचा वापर करण्यासाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत. त्याची अंमलबजावणी न करता वापर केल्यास कारवाई होते. मात्र, तरीही ड्रोनचा वापर दहशतवादी करू शकतात, ही भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते.
हेही वाचा-Mumbai Crime News: शिस्तभंग कारवाई झालेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचा राहत्या घरात सापडला मृतदेह