मुंबई - ‘कोरोना योद्धा मंत्री पेंग्विन टी हे नाईट लाईफसाठी दिले जाणारे टेंडर मंजूर करण्यात व्यस्त आहेत. ते विचार करत आहेत की, आपण काय करतोय हे कोणालाच माहिती नाही. पण टेंडरसाठी जी नावे निघालेली आहेत. ती एकाने जवळून पाहिलेले आहेत. ते पहिले शिकार झालेले आहेत. त्यांना मुंबई सोडत परागंदा व्हावे लागले आहे,’ असा टोला भाजप नेते नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करत लगावला आहे .
मुंबईत नाईटलाइफ सुरू होण्यावरून वाद वारंवार पाहायला मिळाले आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर नाईट लाईफवरून वेळोवेळी टीका करत आलेला आहे. सध्या कोरोनाच संकट असतानाही मंत्री आदित्य ठाकरे हे या परिस्थितीत नाईट लाईफचे टेंडर पास करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी पुन्हा एकदा केला आहे.
याअगोदरही राणे यांनी शिवसेना नेते, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे निशाणा साधला होता. ‘आदित्य ठाकरे यांनी जगातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत बोलू नये. त्यांचे वडील म्हणजेच उद्धव ठाकरे ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्या महाराष्ट्रात देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. इथल्या परिस्थितीची तुलना न्यूयॉर्कशी करण्यापेक्षा इथली परिस्थिती नियंत्रणात कशी आणता येईल ते बघा,’ अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा अजून एक ट्विट करत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांचा मंत्री आदित्य ठाकरेंवर पुन्हा ट्विटद्वारे निशाणा