ETV Bharat / state

वीज ग्राहक हा आमचा देव आहे आम्ही त्याचे नुकसान करणार नाही

नितीन राऊत
नितीन राऊत
author img

By

Published : Nov 20, 2020, 3:49 PM IST

Updated : Nov 20, 2020, 6:09 PM IST

18:04 November 20

वीजबिल माफीबाबत सरकार गंभीर आहे. वीज ग्राहकांची सेवा हाच आमचा धर्म आहे. वीजग्राहक हा आमचा देव आहे. आम्ही त्या ग्राहकाचे नुकसान करणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे

18:04 November 20

केंद्राला मी वारंवार पत्र लिहून १० हजार कोटींच्या अनुदानाचीही मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाजपाला आंदोलन करायचंच असेल तर, त्यांनी केंद्राविरोधात करावं, असाही टोला नितीन राऊत यांनी लगावला. 

16:17 November 20

सायबरहल्ला झाल्याचे मी कधीच म्हटले नाही. 

16:16 November 20

 केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये दिले तर वाढीव वीज बिलांमध्ये माफी देता येईल असंही ते म्हणाले. भाजपा नेत्यांनी वाढीव वीज बिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं मी सर्वांची तपासणी करुन देईन. जर वाढीव वीज बिलं नसतील तर त्यांनी प्रॉमिस करावं आम्ही सर्व वीज बिलं भरु असं आव्हानच उर्जामंत्र्यांनी भाजपाला दिलं आहे.

16:16 November 20

महाराष्ट्रात 100 युनिटपर्यंत वीज सर्वांना सरसकट माफ करण्यासाठी समिती केली होती. त्याचा अहवाल माझ्याकडे आला नाही. संबधित समितीला आम्ही विनंती केली आहे की, त्यांनी अहवाल जमा करावा. 

16:13 November 20

10 हजार कोटी रुपये अनुदान आम्ही केंद्र सरकारला मागितले होते, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना माफी देण्यासाठी आम्ही योजना आणू शकतो. तर ग्राहकांना का नाही देणार? 

16:13 November 20

गेल्या सरकारने त्यांच्या कार्यकाळातील थकबाकीचे डोंगर आमच्या डोक्यावर ठेवले आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही हे धोरण आणले आहे. खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात. आम्हाला शेतकऱ्यांची दगदग माहीत आहे. 

16:06 November 20

नव्या धोरणात साखर कारखान्याचा समावेश केला. जे साखर कारखाने वसुली करतील. त्यांना 10 टक्के सवलत देण्यात येईल. विभागीय अधिकाऱ्यांना आम्ही अधिकार दिले आहेत. सर्व तयारी करूनच आम्ही राज्य मंत्रिमंडळात हे धोरण मंजुरीसाठी आणले आहे. असे धोरण यापूर्वी कधीच आले नाही.

16:02 November 20

ऊर्जामित्र संकल्पना -  गावात राहणारा व्यक्ती, जिला विजेच्या समस्यांबाबत माहिती आहे, तो त्या समस्य़ा सोडविण्यासाठी मदत करू शकतो, अशा व्यक्तीची यासाठी नेमणूक करण्यात येईल. गावातील ऊर्जा समस्यांशी संबंधित प्रश्वावर तो मदत करणार आहे. त्याला इन्सेंटिव्हपण देण्यात येणार आहे. 

16:01 November 20

थकबाकी वसूल करण्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

 थकबाकीवर आम्ही काम करत असून यामध्ये 50 टक्के म्हणजे 20 हजार कोटींचे बील माफ करण्यात येणार आहे. 

16:01 November 20

सर्वंकष धोरण आम्ही आणले आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारे धोरण आहे.

15:51 November 20

जी काही थकबाकी आहे. कृषीक्षेत्रामध्ये 40 हजार कोटीपर्यंतची थकबाकी आहे. कोरोनाकाळात फक्त 1 टक्काच वसूली आहे. थकबाकी वाढल्यामुळे आम्ही खर्च करू शकत नाही. 

15:38 November 20

वीज ग्राहक हा आमचा देव आहे आम्ही त्याचे नुकसान करणार नाही

मुंबई -  राज्यात लोकांना आलेल्या वाढीव वीजबिलाविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात आवाजावी वीजबिलाच्या तक्रारी रोजच पाहायला मिळत आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात वाढीव वीजबिलाची भर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, असे विरोधी पक्षांनी म्हटलं आहे. भाजप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वीज ग्राहक हा आमचा देव आहे आम्ही त्याचे नुकसान करणार नाही, असे ते म्हणाले.

Last Updated : Nov 20, 2020, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.