ETV Bharat / state

Nitin Manmohan : नितीन मनमोहन अत्यवस्थ, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू! - Acute Heart Attack

नितीन मनमोहन यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू ( Nitin Manmohan Treatment In Hospital ) आहेत. हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

nitin manmoha
नितीन मनमोहन
author img

By

Published : Dec 5, 2022, 5:34 PM IST

मुंबई : नितीन मनमोहन यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू ( Nitin Manmohan Treatment In Hospital ) आहे. नितीन यांना हृदय विकाराचा तीव्र झटका ( Nitin Manmohan Heart Attack ) आल्यामुळे त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले ( Treatment At Kokilaben Dhirubhai Ambani Hospital ) आहे.

नितीन मनमोहन अतिदक्षता विभागात : हॉस्पिटलमधील सूत्रांनुसार त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात, आयसीसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच ते व्हेंटिलेटरवर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही समजते. त्यांना कधी डिस्चार्ज मिळणार याबाबत अजून काही स्पष्टता नाही आहे. एकेकाळी रफू चक्कर, गुमनाम, अजनबी, अनोखी अदा, आँधी, अमानुष सारख्या अनेक चित्रपटातून आपल्या खलनायकी अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयाचा थरकाप उडविणारे अभिनेते मनमोहन यांचा सुपुत्र नितीन मनमोहन फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्माता म्हणून प्रसिद्ध आहे.

अभिनयाची गादी चालविणे टाळले : नितीन मनमोहन यांनी आपल्या वडिलांची अभिनयाची गादी चालविण्याचे टाळले. त्यांनी पडद्यामागे काम करण्यास प्राधान्य दिले. त्यांनी एक प्रथितयश निर्माता म्हणून यश मिळविले आहे. त्यांनी निर्मिती केलेले संजय दत्त, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन, ईशा देओल अभिनित दस, जुही चावला आणि ऋषी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला बोल राधा बोल तसेच श्रीदेवी, अनिल कपूर व रवीना टंडन यांच्या अभिनयाने नटलेला लाडला, असे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. नितीन मनमोहन यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहेत आणि ते लवकरच घरी येण्याची वाट पहात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.