ETV Bharat / state

Nitesh Rane Taunts Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या मुलाखत प्रसारणावर नितेश राणेंची टोलेबाजी; म्हणाले हास्यजत्रेचा दोन दिवस प्रोग्राम... - Nitesh Rane Taunts Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामनामधून प्रसिद्ध होणार आहे. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी कडाडून टीका केली आहे. आता दोन दिवस हास्य जत्रेचा प्रयोग पाहायला मिळणार या शब्दात त्यांनी या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.

Nitesh Rane Taunts Uddhav Thackeray
नितेश राणे
author img

By

Published : Jul 25, 2023, 8:00 PM IST

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून दोनवेळा राजकीय भूकंप झाले. पहिल्या राजकीय भूकंपात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले तर दुसऱ्या भूकंपात राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत विराजमान झाले. उद्या आणि परवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. त्याबाबतचा टीझर प्रदर्शीत करण्यात आला. त्यावर हास्य जत्रेचा प्रोग्राम उद्यापासून दोन दिवस चालणार असल्याचा टोला नितेश राणे यांनी टीझर संदर्भात लगावला आहे. अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी बाळासाहेब म्हणाल्याचा दावा त्यांनी केला. आता त्या अण्णा हजारेंच्या हातात मशाल द्या, असे सामनामध्ये म्हणत आहेत. अण्णा हजारे यांना भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभे करायचे असेल तर मातोश्री बाहेर करावे, असे आवाहन नितेश राणेंनी केले आहे.

दोन दिवस हास्यजत्रेचा कार्यक्रम : उद्धव ठाकरे यांची मुलाखत उद्या आणि परवा प्रसारित होणार असल्याने त्यापूर्वी त्याचा टीझर प्रसारित करण्यात आला. यावर उद्यापासून हास्यजत्रेचा दोन दिवस कार्यक्रम सुरू होणार असल्याचे म्हणत नितेश राणे यांनी मुलाखतीची खिल्ली उडविली आहे. महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असे 'टिझर'वर लिहिलयं. त्यावर नितेश राणेंनी आक्षेप नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज हे कुटुंब प्रमुख आहेत. दुसरा कोणीही ऐरागैरा कुटुंब प्रमुख होऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राची त्यांनी माफी मागावी, असे म्हणत स्वतःला मोठी पदवी देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मग आता राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका का : 'टीझर'मध्ये उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखतीत सरकार पडल्यासंदर्भात प्रश्न विचारले असता खेकड्याने धरण फोडल्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. यावर नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याला खेकडे बोलताय. पण, शिवसेना संपविण्याची सुपारी उद्धव ठाकरे यांनी घेतली. राष्ट्रवादीसोबत आम्ही आता पुढे गेलो आहोत. महाविकास आघाडी काळात आधी राष्ट्रवादी तुम्हाला आवडायची आता का टीका करताय, असा प्रश्न नितीश राणेंनी विचारला.

आवाज कोणाचा आणि कुठून येतो ते पाहू : उद्धव ठाकरे यांना मच्छर देखील घाबरत नाही. संजय राऊतकडून काय मुलाखत घेताय? हिंमत असेल तर नितेश राणे किंवा नारायण राणेला मुलाखत द्या, असे आव्हान नितेश राणे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांना मच्छर देखील घाबरत नाही. हिंमत असेल, मर्द असेल तर उद्धव ठाकरेंनी मुलाखत संजय राऊत यांच्याऐवजी मला घेऊ द्यावी. मग आवाज कोणाचा आणि कोठून येतो ते पाहू. काँग्रेसला पक्ष फुटण्याची भीती वाटत असल्यामुळे ते विरोधी पक्षनेता जाहीर करत नाही. ज्या दिवशी विरोधी पक्षनेता जाहीर करतील, त्यादिवशी आमदार जातील असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

हेही वाचा:

  1. MNS Toll Plaza Vandalise : टोलनाका राड्यानंतर मनसे-भाजपमध्ये जुंपली; मनसेकडून भाजपला जशाच तसे उत्तर
  2. Jayant Patil On Manipur Violence : सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय, केंद्र सरकार मात्र निष्क्रिय - जयंत पाटील
  3. Maharashtra Monsoon Assembly Session Updates: नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार -अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.