मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण पूर्णतः तापलेलं असताना अंतरवली सराटीमधील दगडफेक हा या राजकीय वातावरणाचा पहिला टप्पा होता. ही दगडफेक कुणी केली व कोणाच्या आदेशाने केली गेली, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. पोलिसांनी या दगडफेकेतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे याला अटक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबतचा ऋषिकेश बेदरेचा फोटो भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक्सवरून उघड केला आहे. १ सप्टेंबर रोजी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. तर ३ सप्टेंबर रोजी ऋषिकेश बेदरेने पवारांची भेट घेतली, असा आरोपही नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे.
- — nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2023
">— nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2023
महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? नितेश राणे पुढे म्हणाले आहे की, महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेने १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक केली. तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट घेतली. तसेच पवार साहेब, पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? असा सवालही नितेश राणे यांच्याकडून विचारण्यात आला आहे.
राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेक- अंतरवली सराटी येथील मराठा आरक्षणाच्या उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेमधील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत. तसेच अंतरवलीच्या घटनेनंतर ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फडणवीसांवर अनेक आरोप - जालन्यातील अंतरवली सराटी येथील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते, यावरून विरोधकांनी तसेच मराठा नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. या घटनेनंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली. लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून दिले नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. तरी सुद्धा जालन्यातील घटनेवरून फडणवीसांवर अनेकांनी आरोप केले होते. थेट शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपाला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे.
हेही वाचा-