ETV Bharat / state

Nitesh Rane : ...तर उद्धव ठाकरेंना जबाबदार ठरवायचं का? नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल - खासदार संजय राऊत

Nitesh Rane On Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरुन सरकारवर हल्लाबोल केलाय. तर याप्रसंगी नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, अपघातावर घाणेरडं राजकारण करण्याचं काम संजय राऊत यांनी सुरू केलंय. तसेच कोस्टल रोड (Mumbai Coastal Road) हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मिरवत आहात. त्यावर जर अपघात झाला तर त्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दोषी ठरवायचं का? असा प्रश्नही नितेश राणे यांनी विचारलाय.

Nitesh Rane On Sanjay Raut
नितेश राणे यांचा खडा सवाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 5:32 PM IST

Updated : Oct 15, 2023, 5:46 PM IST

मुंबई : Nitesh Rane On Sanjay Raut : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातासाठी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारला जबाबदार ठरवलंय. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधलाय. त्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समाजवादी नेत्यांशी हितगुज करत आहेत. या भेटीवरूनसुद्धा नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केलाय. मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांना दोषी ठरवायचं का? : नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा अतिशय दुर्देवी आहे. त्या अपघातावर घाणेरडं राजकारण करण्याचं काम संजय राऊत यांनी सुरू केलंय. सरकार म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यात विकासाची दालनं खुली व्हावीत म्हणून हा महामार्ग तयार केला आहे. ज्या जनतेसाठी हा महामार्ग तयार करताय, त्यावर अशा घटना व्हाव्यात अशी कोणाचीच इच्छा नसते. राणे पुढे म्हणाले, ज्या महामार्गाचं नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आहे, त्याला संजय राऊत शाप कसे म्हणतात? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी महामार्ग तयार करताना आमचा हिस्सा काय? अशी विचारणा केली होती. त्या कंत्राटदाराने तोंड उघडले, तर उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडणार नाहीत. कोस्टल रोड (Mumbai Coastal Road) हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मिरवत आहात. त्यावर जर अपघात झाला तर त्यासाठी उद्धव ठाकरे यांना दोषी ठरवायचं का?.

उद्धव ठाकरेंनी सुपारी घेतली का? : म्हारू गुजरात यावरून सध्या मुंबईत वाद निर्माण झालाय. गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन गेल्यानंतर हा वाद सुरू झालाय. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, शिवसेनेनं त्यावेळी गुजराती भाषेत पत्र लिहिलं होतं. तेव्हा तुम्हाला गुजराती चालत होतं. गुजरातचे मुख्यमंत्री आल्यावर तुम्हाला चटके लागत आहेत. ३० नोव्हेंबर २०२१ ला ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या, तेव्हा त्यांनी उद्योजकांची भेट घेतली होती. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरं यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. त्याच बंगालमध्ये हिंदूंना जिवंत जाळलं जातं. मग ज्या गुजरातमध्ये हिंदू सुरक्षित आहेत, गुजराती माणसाचं योगदान मुंबईत आहे. मग त्या गुजराती माणसांसाठी तुम्हाला चटके का लागतात? हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या जिहादींकडून तुम्ही सुपारी घेतली आहे का? हिंदूंवर अन्याय झाला, तर एका शब्दानं उद्धव ठाकरे बोलत नाहीत.

आता दाऊदला बोलवा व फराळ द्या : नितेश राणे पुढे म्हणाले, ज्या समाजवाद्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी इतिहास घडवला, मराठी माणसाचा आवाज म्हणून शिवसेना मोठी झाली. तर आता कधी रजा अकादमी, तर कधी डीएमके व समाजवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून उद्धव ठाकरे हे बसत आहेत. आता दाऊदला बोलवा आणि त्याला दिवाळीचा फराळ खायला घाला.

हेही वाचा -

  1. Samruddhi Mahamarg Accident : अपघातातील मृतांच्या वारसांना केंद्रासह राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर, राजकीय नेत्यांच्या वाचा प्रतिक्रिया
  2. Samruddhi Mahamarg Accident : महामार्गावरील आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करा; अपघातानंतर दानवेंची मागणी, पहा व्हिडिओ
  3. Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर १२ जणांचा मृत्यू, पंतप्रधान कार्यालयाकडून मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर

माहिती देताना आमदार नितेश राणे

Last Updated : Oct 15, 2023, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.