मुंबई: ग्रॉस डोमेस्टिक क्लायमेट रिस्क या शीर्षकाखाली 2050 मध्ये जगभरातील 2600 राज्य आणि प्रांतांचा हवामानाबाबत धोक्याच्या पातळीचे मूल्यांकन करण्यात आलेले आहे. पूर जंगलातील आग आणि समुद्राच्या पातळीत वाढ यासारख्या अत्यंत हवामानातील बदल आणि मालमत्तेचे नुकसान याबाबतचे मॉडेल तयार करून अतिजोखीम असलेल्या राज्यांची क्रमवारी ठरवण्यात आली आहे.
चीन अमेरिका भारताला धोका: 2000 मधील 50 टॉप जोखीम असलेल्या राज्यांपैकी 80 टक्के राज्य ही चीन अमेरिका आणि भारतातील आहेत. चीन नंतर भारतामध्ये टॉप 50 मध्ये सर्वाधिक नऊ राज्य आहेत. ज्यात बिहार 22 व्या स्थानावर, उत्तर प्रदेश 25 व्या स्थानावर, आसाम 28 व्या स्थानावर, राजस्थान 32 व्या स्थानावर, तामिळनाडू 36 व्या स्थानावर, महाराष्ट्र 36 व्या स्थानावर, गुजरात 48 व्या स्थानावर, पंजाब 50 व्या स्थानावर तर केरळ 52 व्या स्थानी आहे.
सर्वाधिक फटका आशियाला : हवामानातील बदलामुळे वातावरणात मोठे बदल होत आहेत? याचे सर्वाधिक नुकसान जगाला सहन करावे लागत असून याचा सर्वाधिक फटका आशिया खंडाला बसत आहे. आशियाला हवामान बदलामुळे सर्वाधिक नुकसान सहन करावे लागत आहे. आशिया खंडातील ५० प्रांताना धोका दर्शविण्यात आला आहे. त्यापैकी बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, पंजाब, केरळ, महाराष्ट्र ही ९ राज्ये भारतात आहेत.
मुंबईतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण: जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या पुनर्विकासाच्या कामामुळे तसेच रस्त्यांच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे मुंबईकरांना खोकला घसा दुखी आणि श्वसनाचे आजार होत आहेत. विशेष करून लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
नवी मुंबईची एसआयटी द्वारे चौकशी: नवी मुंबईमध्ये वायू प्रदूषणात वाढ झाल्याने याला जबाबदार असलेल्या रासायनिक कंपन्यांवर कारवाई करावी, तळोजा एमआयडीसी मध्ये कोणत्या कंपन्यांकडून रात्रीच्या वेळी वायूचे उत्सर्जन केले जाते. त्यावर चा शोध घेऊन त्यांना वायू प्रदूषण नियंत्रक बसवण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने द्यावेत. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांनी तज्ञ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करून तीन आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देश लोकायुक्तांनी राज्य सरकारला दिले आहेत.